शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: लेंगरे येथे जिल्हा परिषदेत शाळेत गॅसचा स्फोट, 'ती' माऊली धावली अन् विद्यार्थी वाचले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2025 15:52 IST

रफिक आतार    लेंगरे: खानापूर तालुक्यातील लेंगरे येथील जिल्हा परिषदेच्या गुजलेवस्ती शाळेत मध्यान भोजन आहार शिजवण्याच्या खोलीत गॅसचा स्फोट ...

रफिक आतार   लेंगरे: खानापूर तालुक्यातील लेंगरे येथील जिल्हा परिषदेच्या गुजलेवस्ती शाळेत मध्यान भोजन आहार शिजवण्याच्या खोलीत गॅसचा स्फोट झाला. या स्फोटात सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. आज, मंगळवारी सकाळी ही घटना घडली. घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, आज, सकाळी स्वप्नाली संतोष गायकवाड ह्या मध्यान भोजन शिजवण्यासाठी शाळेत आल्या. आहार शिजवण्यासाठी गॅस सुरु केला. गॅसचा आवाज येऊ लागल्याने गॅस बंद करत असताना मोठा जाळ झाला. गायकवाड यांनी तातडीने बाहेर पडत आणि प्रसंगावधान राखत विद्यार्थ्यांना शाळे बाहेर काढले. दरम्यानच, गॅसचा मोठा स्फोट झाला. यात शेडचे पत्रे दुरवर उडाले. मोठा स्फोट झाल्याने नागरीकांनी शाळेकडे धाव घेतली. आगीचे ज्वाळा सुरु असताना नागरीकांनी आग विझविण्यासाठी प्रयत्न सुरु केले. सुदैवाने कोणतीही जीवीत हानी न होता आग आटोक्यात आली. घटनेची माहिती मिळताच ग्रामविकास अधिकारी सुभाष भोते, सरपंच लक्ष्मी ताई पाटील, माजी चेअरमन सुनिल पाटील, माजी उपसरपंच राजेंद्र देशमुख, ग्रामपंचायत सदस्य संजय गायकवाड व एजाज देसाई यांनी घटनास्थळी तातडीने धाव घेतली. 'ती' माऊली धावली अन् विद्यार्थी वाचलेस्वप्नाली गायकवाड यांनी आग लागल्याचे दिसताच विद्यार्थ्यांना शाळेच्या आवारातून बाहेर काढले. परिणामी कोणालाही इजा झाली नाही. ती माऊली धावली अन चिमुकली वाचली अशी चर्चा सुरु होती. 

टॅग्स :Sangliसांगलीzpजिल्हा परिषदSchoolशाळाCylinderगॅस सिलेंडरBlastस्फोटfireआग