शहरं
Join us  
Trending Stories
1
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
2
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
3
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
4
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
5
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; IPL अन् ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
6
हरियाणातील BJP सरकार अल्पमतात; 3 अपक्ष आमदारांनी साथ सोडली, काँग्रेसला दिला पाठिंबा
7
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
8
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
9
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात ५४.०९ टक्के मतदान
10
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
11
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
12
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
13
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
14
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
15
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
16
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
17
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
18
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
19
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
20
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून

जन्मठेपेतील आरोपीचा सांगलीत निर्घृण खून, पूर्ववैमनस्यातून घटना : दगडाने ठेचले : चार हल्लेखोरांना मिरजेत अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 02, 2018 2:18 PM

पूर्ववैमनस्यातून हरिपूर (ता. मिरज) येथील रमेश तमण्णा कोळी (वय ३८) याचा दगडाने ठेचून निर्घृण खून करण्यात आला. कोल्हापूर रस्त्यावरील आकाशवाणी केंद्रासमोर सोमवारी मध्यरात्री ही घटना घडली. घटनेनंतर दुचाकीवरुन पळून गेलेल्या चार हल्लेखोरांना अवघ्या दोन तासात मिरजेतील बसस्थानकावर पकडण्यात यश आले. मृत कोळी हा जन्मठेपेतील आरोपी आहे.

ठळक मुद्देजन्मठेपेतील आरोपीचा सांगलीत निर्घृण खूनपूर्ववैमनस्यातून घटना : दगडाने ठेचले चार हल्लेखोरांना मिरजेत अटक

सांगली : पूर्ववैमनस्यातून हरिपूर (ता. मिरज) येथील रमेश तमण्णा कोळी (वय ३८) याचा दगडाने ठेचून निर्घृण खून करण्यात आला. कोल्हापूर रस्त्यावरील आकाशवाणी केंद्रासमोर सोमवारी मध्यरात्री ही घटना घडली. घटनेनंतर दुचाकीवरुन पळून गेलेल्या चार हल्लेखोरांना अवघ्या दोन तासात मिरजेतील बसस्थानकावर पकडण्यात यश आले. मृत कोळी हा जन्मठेपेतील आरोपी आहे. सध्या तो जामिनावर बाहेर होता.

अटक केलेल्यांमध्ये रवी रमेश खत्री (वय २९, रा. मंगलमूर्ती कॉलनी, सावंत प्लॉट, सांगली), जावेद जहाँगीर जमादार (३२, फौजदार गल्ली, सांगली), सोमनाथ दादासाहेब डवरी (२९, मुख्य बसस्थानकामागे, सांगली) व अमीर उर्फ मिस्त्री मन्सूर नदाफ (३०, खणभाग, शांतिनगर, सांगली) यांचा समावेश आहे. त्यांनी रमेश कोळीचा खून केल्याची कबूली दिली आहे. यातील रवी खत्री हा मुख्य संशयित आहे.

चौघेही रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहेत. त्यांच्याविरुद्ध खून, खुनाचा प्रयत्न, मारामारी, बेकायदा हत्यार बाळगणे, दहशत माजविणे असे गुन्हे नोंद आहेत. आठवड्यापूर्वी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने रवी खत्री व सोमनाथ डवरीला केली होती. त्यांच्याकडून एक तलवार जप्त केली होती. या गुन्ह्यातून ते दोन दिवसात जामिनावर बाहेर आले होते.मृत रमेश कोळी व रवी खत्री चांगले मित्र होते. रमेश हा जयसिंगपूर (ता. शिरोळ) येथे जुगाराच्या क्लबमध्ये कामाला होता. तिथे खत्री त्याला पैसे मागण्यास जात असे. पैशावरुन चार महिन्यापूर्वी त्यांच्यात कडाक्याचे भांडण झाले होते. तेंव्हापासून दोघे बोलत नव्हते.

सोमवारी रात्री रमेश व त्याचा मित्र अजित आनंदराव पवार (३५, शिवनेरीनगर, कुपवाड) हे कोल्हापूर रस्त्यावरील एका हॉटेलमध्ये दारु पिण्यास गेले होते. रवी खत्रीसह चौघेही याच हॉटेलमध्ये दारु पित बसले होते. त्यावेळी रमेश व खत्री यांची एकमेकांकडे नजरा-नजर झाली. त्यांना पाहून रमेश व त्याचा मित्र अजित पवार हॉटेलमधून बाहेर पडले. त्यांच्या पाठोपाठ खत्रीसह चौघेही बाहेर आले.

हॉटेलसमोर मुख्य रस्त्याकडेला रमेश उभा होता. खत्रीने त्याला तू फार शहाणा होऊ नकोस, माझ्याकडे का रागाने पाहिलासह्, अशी विचारणा केली. यातून दोघांत वाद झाला. खत्रीसह चौघांनी त्याला शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन रस्त्यावर पाडले. त्यानंतर रस्त्यावरील दोन दगड घेऊन त्याच्या डोक्यात घातले.डोक्याचा चेंदामेंदा झाल्याने प्रचंड रक्तस्त्राव होऊन रमेशचा जागीच मृत्यू झाला. हा प्रकार पाहून त्याचा मित्र अजित पवार हा तेथून पळून गेला. या घटनेची माहिती मिळताच शहरचे पोलिस निरीक्षक रवींद्र शेळके, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे राजन माने, गुंडाविरोधी पथकाचे सहाय्यक निरीक्षक संतोष डोके, रोहित चौधरी घटनास्थळी दाखल झाले. हॉटेलमधील कर्मचारी तसेच अजिय पवार याच्याकडून माहिती घेऊन पोलिसांनी हल्लेखोरांचा शोध सुरु ठेवला.मिरजेत सापडलेखत्रीसह चौघे कोल्हापूर रस्त्यावरुन अंकलीमार्गे मिरजेकडे पळून गेल्याची माहिती मिळाली. कदाचित ते मिरज बसस्थानकावरुन कर्नाटकात जाऊ शकतात, असा विचार करुन स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पथक मिरजेला रवाना झाले. पहाटे साडेचार वाजता चौघांनाही पकडण्यात यश आले. त्यांच्या अंगावरील कपड्यावर रक्ताचे डाग होते. सांगलीच्या शासकीय रुग्णालयात चौघांची वैद्यकीय तपासणी करुन त्यांचे रक्ताचे डाग असलेले कपडे जप्त केले आहेत.रमेश जामिनावर बाहेरहरिपूर (ता. मिरज) येथील गुंड रोहित उर्फ बापू झेंडे याचा २००६ मध्ये भरदिवसा काळ्या खणीजवळील प्रेमनगरमध्ये गळा चिरुन खून झाला होता. याप्रकरणी रमेश कोळीसह चौघांना अटक केली होती. रोहित झेंडे हा रमेशकडे खंडणी मागायचा. खंडणी नाही दिली तर तो जिवे मारण्याची धमकी द्यायचा.

तो आपल्याला मारेल, या भितीने रमेशने साथीदारांच्या मदतीने रोहितचा खून केला होता. या प्रकरणार रमेशला जिल्हा न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. या शिक्षेविरुद्ध त्याने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यामुळे सध्या तो जामिनावर बाहेर होता.दारुचा मोह नडलारमेश कोळी व अजित पवार हे दोघेही जयसिंगपूरला क्लबमध्ये काम करीत होते. दोघेही कामावर एकत्रित जात व येत असे. रविवारी थर्टीफस्टदिवशी दोघांनी पार्टी केली. सोमवारी दिवसभर रमेश हा अजित पवारच्या कुपवाड येथील घरी झोपून होता. रात्री दोघेही घरातून बाहेर पडले. कुपवाड येथे एका हॉटेलमध्ये त्यांनी दारुचे सेवन केले. रमेशला सोडण्यासाठी अजित सांगलीत आला होता. पण त्यांना आणखी दारु पिण्याची इच्छा झाली. त्यामुळे हॉटेलमध्ये गेले होते.

टॅग्स :MurderखूनSangliसांगलीPoliceपोलिस