शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

Sangli Crime: घरफोड्या करणारी आंतरराज्य टोळी जेरबंद, २६ लाखांचा ऐवज जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2025 16:11 IST

संतोष चव्हाण रेकॉर्डवरील गुन्हेगार

सांगली : जत, विटा, चिंचणी वांगी, इस्लामपूर व आटपाडी परिसरात घरफोड्या करणाऱ्या चौघांच्या टोळीस स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने अटक केली. बंद दुकाने व घरे फोडून चोरी करण्याची त्यांची पद्धत होती.चोरीतील सोनेचांदीचे दागिने विकण्यासाठी जात असताना सापळा रचून त्यांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून दागिने, चारचाकीसह २६ लाख २४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. संशयितांपैकी एकावर महाराष्ट्र व कर्नाटकमध्ये अनेक गुन्हे दाखल आहेत.संतोष तुळशीराम चव्हाण (वय ४२), आशुतोष संतोष चव्हाण (वय २१, दोघेही रा. एकता नगर, सातारा रस्ता, जत), करण अर्जुन चव्हाण ( वय १९, रा. होनसळ, ता. सोलापूर) व पांडुरंग सुनील पवार (वय २६, रा. होटगी, सोलापूर) अशी संशयितांची नावे आहेत. या चौघांना अटक करण्यात आली आहे.पोलिस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या आदेशानुसार सहायक पोलिस निरीक्षक सिकंदर वर्धन यांच्या पथकाने ही कारवाई केली. जत परिसरात चोरीतील माल विक्रीसाठी काही चोरटे येणार असल्याची माहिती त्यांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला. वर्धन यांच्या पथकामधील प्रमोद साखरपे, हणमंत लोहार, सोमनाथ गुंडे यांचा त्यात सहभाग होता. जत ते कवठेमहांकाळ रस्त्यावरील जाधव वस्ती येथील रज्जाक नगारजी यांच्या बंद असलेल्या हॉटेल सानिया गार्डन येथे सापळा लावला.तेथे संशयित चौघे जण एका पांढऱ्या रंगाच्या चारचाकीने आले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. गाडीत सीटखाली सोन्याचे व चांदीचे दागिने, स्टीलची पाइप, कटावणी, चाकू, पाना, स्कू ड्रायव्हर, बॅटरी, मास्क, हातमोजे मिळाले. गेल्या काही महिन्यांत जत, विटा, इस्लामपूर, चिंचणी वांगी व आटपाडी परिसरात बंद घरफोडी केल्याची कबुली दिली. चोरीचा मुद्देमाल विकण्यासाठी घेऊन जात असल्याचे सांगितले. पथकाने आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपासकामी जत पोलिसांच्या ताब्यात दिला.

संतोष चव्हाण रेकॉर्डवरील गुन्हेगारसंशयित संतोष चव्हाण हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्यावर जत व कर्नाटकमध्ये घरफोडी व चोरीचे गुन्हे दाखल आहेत. त्याचा मुलगा आशुतोषही गुन्ह्यात सहभागी होत आहे.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस