शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

फत्तेसिंगराव नाईक यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे आज अनावरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 04:24 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शिराळा : चिखली (ता. शिराळा) येथे २२ जानेवारी रोजी लोकनेते स्व. फत्तेसिंगराव नाईक यांचे विश्वास कारखाना ...

लोकमत न्यूज नेटवर्क

शिराळा : चिखली (ता. शिराळा) येथे २२ जानेवारी रोजी लोकनेते स्व. फत्तेसिंगराव नाईक यांचे विश्वास कारखाना स्थळावर उभारलेल्या स्मृतिस्थळाचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती अध्यक्ष आमदार मानसिंगराव नाईक यांनी दिली.

ते म्हणाले, लोकनेते स्व. फत्तेसिंगआप्पांची व आई स्व. लीलावती नाईक यांची २२ जानेवारी रोजी पुण्यतिथी आहे. या औचित्याने शिराळा विधानसभा मतदारसंघ व शाहूवाडी तालुक्याच्या विकासासाठी भगीरथ प्रयत्न करणाऱ्या आप्पांच्या स्मृती चिरंतन जतन व्हाव्यात म्हणून कारखाना कार्यस्थळावर त्यांचे स्मृतिस्थळ व पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला आहे. स्व. आप्पांचे संपूर्ण जीवन संघर्षात गेले. सर्वसामान्य, शेतकरी, कष्टकऱ्यांच्या प्रगतीसाठी त्यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करत मोठा संघर्ष केला. विश्वास कारखान्यामुळे दोन्ही तालुक्यातील शेती व शेतकऱ्यांत बळ निर्माण केले. शिराळा व शाहूवाडी तालुक्यात विविध पाणीयोजना उभ्या केल्या. शिराळा तालुक्यातील उत्तर विभागासाठी वाकुर्डे योजनेची संकल्पना मांडून त्याचा शासन दरबारी पाठपुरावा केला. एकूणच लोकनेते स्व. आप्पांचे जीवन सर्वसामान्य माणसाच्या प्रगतीसाठी समर्पित होते. त्यांनी शेती, सहकार, उद्योग, शिक्षण, सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक व कष्टकरी, शेतकरी व समाजाच्या तळागाळापर्यंत राबणाऱ्या हातासाठी केलेल्या कामाची हे स्फूर्तिस्थळ चिरंतन प्रेरणा देत राहील.

म्हणूनच या स्थळाचे उद‌्घाटन व पुतळ्याचे अनावरण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी राज्याचे जलसंपदा मंत्री, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील, सहकार, कृषी व सामाजिक न्याय राज्यमंत्री विश्वजित कदम, खासदार श्रीनिवास पाटील, खासदार धैर्यशील माने, माजी मंत्री अण्णासाहेब डांगे, आमदार मोहनराव कदम, माजी खासदार राजू शेट्टी, माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक, आमदार सुमनताई पाटील, आमदार अरुणअण्णा लाड, कारखान्याचे उपाध्यक्ष, माजी आमदार बाबासाहेब पाटील, माजी आमदार सत्यजित पाटील व माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सत्यजित देशमुख उपस्थित राहणार आहेत. हा कार्यक्रम दुपारी ३ वाजता कारखाना कार्यस्थळावर चिखली येथे संपन्न होईल. त्यासाठी कारखाना कार्यक्षेत्रातील असलेल्या शिराळा, शाहूवाडी तसेच वाळवा तालुक्यातील नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहनही त्यांनी केले.