शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Sangli- गिरगाव खून प्रकरणातील फरार संशयितास अटक, तीन दिवसाची पोलीस कोठडी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2023 12:30 IST

जत : गिरगाव (ता.जत) येथे महादेवाप्पा राजशेखर हिरेमठ  (वय-३५) यांच्या खून प्रकरणातील संशयित फरारी आरोपीस उमदी पोलिसांनी अटक केली. ...

जत : गिरगाव (ता.जत) येथे महादेवाप्पा राजशेखर हिरेमठ  (वय-३५) यांच्या खून प्रकरणातील संशयित फरारी आरोपीस उमदी पोलिसांनी अटक केली. संशयित दत्ता यल्लाप्पा बजंत्री (रा. कुंभार गल्ली विजयपूर) असे त्याचे नाव आहे. त्याला जत न्यायालयासमोर हजर केले असता २४ सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.गिरगाव (ता.जत) येथे सुखदेव साबू ब्याळकुळी यांच्या घरासमोरील पत्रा शेड मधील कट्ट्यावर दारूच्या नशेत महादेवाप्पा हिरेमठ याचा दत्ता बजंत्री याने धारदार शस्त्राने वार करून २८ जानेवारीला खून केला होता. याची फिर्याद प्रशांत चंद्रकांत हिरेमठ यांनी उमदी पोलिसांत दिली होती. मयत व आरोपी दोघेही गिरगाव येथे घर बांधकामाचे काम करीत होते. खून झाल्यासून संशयित आरोपी दत्ता बजंत्री फरार होता. उमदी पोलिस ठाण्याचे सपोनि संदीप शिंदे यांनी तपास  करून संशयित आरोपी दत्ता बजंत्री यास ताब्यात घेऊन  अटक केली आहे. त्याला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने २४ सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. अधिक तपास उमदी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी संदीप शिंदे करीत आहेत.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस