शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

इंधन दरवाढीचा निषेध, सांगलीत काँग्रेसची सायकल रॅली

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2018 14:23 IST

पेट्रोल, डिझेल दरवाढप्रश्नी केंद्र आणि राज्य शासनाच्या निषेधाच्या घोषणा देत कॉंग्रेसने बुधवारी सांगलीत सायकल रॅली काढली. ‘इंधनावरील अन्यायकारक कर रद्द करा’, ‘गॅस सिलिंडरची दरवाढ रद्द करा’ अशा घोषणा यावेळी कार्यकर्त्यांनी दिल्या. 

सांगली : पेट्रोल, डिझेल दरवाढप्रश्नी केंद्र आणि राज्य शासनाच्या निषेधाच्या घोषणा देत कॉंग्रेसने बुधवारी सांगलीत सायकल रॅली काढली. ‘इंधनावरील अन्यायकारक कर रद्द करा’, ‘गॅस सिलिंडरची दरवाढ रद्द करा’ अशा घोषणा यावेळी कार्यकर्त्यांनी दिल्या. कॉंग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. कॉंग्रेस भवनापासून सायकल रॅलीला सुरुवात झाली. या रॅलीत कॉंग्रेसचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते. आझाद चौक, स्टेशन चौक, कापडपेठ, हरभट रोड, गणपती पेठ, पटेल चौक, आमराई, कॉलेज कॉर्नर, आपटा पोलिस चौकी, राम मंदिर चौकमार्गे रॅली कॉंग्रेस भवनापर्यंत आली. याठिकाणी रॅलीची सांगता करण्यात आली. इंधन दरवाढ रद्द करण्यासह शासनाच्या निषेधाचे फलक सायकलला लावण्यात आले होते. कॉंग्रेस भवनासमोर रॅलीचा समारोप होताना पृथ्वीराज पाटील म्हणाले की, ‘अच्छे दिन’चा नारा देत सत्तेवर आलेल्या भाजप सरकारने सामान्य लोकांचे जगणे मुश्किल केले आहे. आधीच महागाईच्या खाईत गेलेल्या नागरिकांवर आणखी महागाईचा बोजा टाकण्याचे काम सरकार करीत आहे. पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीमुळे सर्व घटकांवर परिणाम होत आहेत. वाहतूक खर्च वाढून जीवनावश्यक वस्तुंचे दरही वाढत आहेत. देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या काळात क्रूड आॅईल (कच्चे तेल)चा भाव ११0 रुपये प्रति बॅरेल होता. त्यावेळी पेट्रोल ६0 ते ६५ रुपये लिटरने मिळत होते. नरेंद्र मोदींच्या काळात डिसेंबर महिन्यात कच्च्या तेलाची किंमत बॅरेलमागे २५.२८ रुपयांनी कमी होऊनही पेट्रोल ८0 रुपये लिटरपर्यंत वाढले आहे. त्यामुळे हा नेमका गोलमाल काय आहे, असा प्रश्न सामान्य माणसाला पडला आहे. मोदी सरकारच्या काळात पेट्रोलचा भाव शंभर रुपयांपर्यंत जाईल, असा अंदाज आता वर्तविला जात आहे. महाराष्ट्र शासन पेट्रोलवर ९ रुपये अधिभार आणि २५ टक्के व्हॅट आकारत आहे. त्यामुळे जनतेची ही मोठी लूट आहे. आम्ही त्यांचा निषेध करीत आहोत, असे पाटील म्हणाले. आंदोलनात नगरसेवक राजेश नाईक, डॉ. राजेंद्र मेथे, रवी खराडे, बिपीन कदम, मंगेश चव्हाण, कय्युम पटवेगार, अमित पारेकर, सनी धोत्रे, संतोष पाटील, आशिष चौधरी, अशोक मासाळ, मुफित कोळेकर, धनराज सातपुते, रफिक मुजावर, सचिन चव्हाण, शहाजी जाधव, मौलाअली वंटमुरे, पैगंबर शेख, संग्राम चव्हाण, दत्तात्रय मुळीक आदी सहभागी होते. 

टॅग्स :SangliसांगलीPetrolपेट्रोलDieselडिझेल