स्वातंत्रसैनिक माधवराव भुजंगराव माने यांचं निधन; १०० व्या वर्षी अखेरचा श्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2024 09:03 IST2024-02-21T09:03:10+5:302024-02-21T09:03:24+5:30

स्वातंत्र सैनिक माधवराव माने यांच्यावर भारती हाॅस्पीटलमध्ये उपचार सुरू होते

Freedom fighter Madhavrao Bhujangrao Mane passed away | स्वातंत्रसैनिक माधवराव भुजंगराव माने यांचं निधन; १०० व्या वर्षी अखेरचा श्वास

स्वातंत्रसैनिक माधवराव भुजंगराव माने यांचं निधन; १०० व्या वर्षी अखेरचा श्वास

कुपवाड : सांगली शहरातील बालाजीनगर येथील ज्येष्ठ स्वातंत्र सैनिक माधवराव भुजंगराव माने (आप्पा) यांचे आज ( बुधवारी)  दुःखद निधन झाले. वयाच्या १०० व्या वर्षे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 

स्वातंत्र सैनिक माधवराव माने यांच्यावर भारती हाॅस्पीटलमध्ये उपचार सुरू होते. सकाळी 9 वाजता त्यांचे पार्थिव घरी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.विश्रामबाग येथील क्रांतिसिंह नाना पाटील पुतळ्याजवळ अंत्यदर्शनासाठी सकाळी 10 वाजता त्यांचे पार्थिव ठेवण्यात येणार आहे. सांगलीच्या अमरधाममध्ये सकाळी 11 च्या सुमारास त्यांच्यावर अंत्यसंस्कार  होतील.

Web Title: Freedom fighter Madhavrao Bhujangrao Mane passed away