मिरजेत बोगस जमीन खरेदी व्यवहारात पावणेपाच लाखांची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:30 IST2021-09-22T04:30:14+5:302021-09-22T04:30:14+5:30
फसवणूकप्रकरणी यशवंत प्रधान शिंदे (रा.जलाराम चौक, सुभाषनगर), राजू इलाही म्हेत्रे (रा.महात्मा फुले कॉलनी, मिरज), अमोल रणधीर (रा.इंदिरानगर मिरज ), ...

मिरजेत बोगस जमीन खरेदी व्यवहारात पावणेपाच लाखांची फसवणूक
फसवणूकप्रकरणी यशवंत प्रधान शिंदे (रा.जलाराम चौक, सुभाषनगर), राजू इलाही म्हेत्रे (रा.महात्मा फुले कॉलनी, मिरज), अमोल रणधीर (रा.इंदिरानगर मिरज ), नितेश प्रकाश वायदंडे (रा.इंदिरानगर, मिरज), बाळासाहेब शंकर शेटे (रा.गव्हर्मेंट कॉलनी, विश्रामबाग), पवनराज तात्यासाहेब पाटील (रा.राणा प्रताप चौक, कुपवाड) व शकील आब्बास गोदड (रा.सुभाषनगर, मिरज) या सात जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
मिरज-पंढरपूर रस्त्यावर खुल्या भूखंडातील सात गुंठे जमीन बाजारभावापेक्षा कमी किमतीत विक्री करणार असून, बाळासाहेब शंकर शेटे हे जमिनीचे मालक असल्याचे आरोपींनी कृष्णकांत थोरात यांना सांगितले होते. त्यानुसार, १५ डिसेंबर, २०२० रोजी नेहा अमर थोरात व अमृता कृष्णकांत थोरात यांनी जमिनीची खरेदी केली. खरेदी दस्त करताना जमिनीचे मालक हे बाळासाहेब शंकर शेटे मृत असतानाही शेटे यांच्याऐवजी बोगस व्यक्तीने जमीन खरेदी दस्त करून दिला. त्यानंतर, जमीन खरेदी देणारा तोतया असल्याचे व बोगस व्यवहार केल्याचे निष्पन्न झाले. खरेदी व्यवहारासाठी थोरात यांच्याकडून धनादेश व रोख स्वरूपात चार लाख ८९ हजार रुपये घेऊन फसवणूक केल्याबद्दल कृष्णकांत थोरात त्यांनी मिरज शहर पोलिसात सात जणांविरोधात तक्रार दिली आहे. या प्रकरणी पोलिसांनी संबंधिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.