शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणूक: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
2
राजा भैय्याच्या शस्त्रपूजेचा पोलिस तपास अहवाल आला; दसऱ्याला डझनभर शस्त्रांचे पूजन केले होते
3
भाजपा टू भाजपा व्हाया मनसे...! महापालिका निवडणुकीपूर्वी माजी आमदार तृप्ती सावंत यांची घरवापसी
4
पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, CM फडणवीसांचे चौकशीचे आदेश, म्हणाले, 'अजितदादा अशा गोष्टींना...'
5
CM असताना कारपेट सोडलं नाही, आता कितीही प्रयत्न केले तरी...; फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार!
6
गर्भवती पत्नीच्या मृत्यूनं बसला धक्का; १२ तासांनी पतीनेही सोडला जीव; एकाचवेळी २ तिरडी निघणार
7
Cristiano Ronaldo: "मला माझ्या कुटुंबाला, मुलांना वेळ द्यायचा आहे" रोनाल्डो निवृत्तीच्या वाटेवर!
8
VIRAL : लग्नाच्या अगदी आधी वराची 'डिमांड लिस्ट' वाचून सासरे रडले! असं काय लिहिलं होतं?
9
लोन EMI भरतानाच कमवा व्याजाएवढा परतावा! ही 'स्मार्ट इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी' माहीत आहे का?
10
“...तर मग पुढील महिन्यापासून माझ्या प्रत्येक बहिणीला २१०० रुपये द्या”; उद्धव ठाकरेंची मोठी मागणी
11
'बिग बॉस १९'च्या विजेत्याचं नाव लीक! रनर-अप आणि टॉप ५ची यादीही आली समोर
12
आनंद महिंद्रा RBL बँकेतील संपूर्ण हिस्सा विकणार; अवघ्या २ वर्षात कसा कमावला २७४ कोटींचा नफा
13
रशिया-युक्रेन युद्धाचा नवा केंद्रबिंदू; 'या' छोट्या शहरावर पुतिन यांचा डोळा, कारण काय?
14
हेअर फॉलला करा गुड बाय; लांब, काळ्याभोर केसांसाठी 'या' सोप्या सवयी, होईल मोठा फायदा
15
Vastu Shastra: मनी प्लांट चुकीच्या दिशेला ठेवाल, तर आयुष्यभर पश्चात्ताप कराल; पाहा योग्य दिशा!
16
घरी येत होता इलेक्ट्रिशियन, डॉक्टर पत्नी झाली फिदा; पतीला संपवण्याचा कट रचला, पण एका चुकीने...
17
बांगलादेशला कांद्याने रडवलं, भारताने निर्यात रोखली! एक किलोची किंमत ऐकून बसेल धक्का
18
भारताला रामराम? पुष्कर जोग झाला UAEचा 'गोल्डन व्हिसा'धारक, म्हणाला, "माझ्या मुलीच्या..."
19
PM मोदींनी याही वर्ल्ड कप ट्रॉफीला स्पर्श केला नाही; जिंकली मने, जाणून घ्या स्पर्श न करण्यामागचे कारण
20
काय म्हणावे याला...! कोलकातामध्ये SIR विरोधात मोर्चा काढला, दुसऱ्याच दिवशी ममता बॅनर्जींनी BLOकडून 'फॉर्म' स्वीकारला...

Sangli: जतमध्ये पूर्ववैमनस्यातून घरात घुसून चौघांना बेदम मारहाण; अल्पवयीन मुलीचा विनयभंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2024 16:09 IST

तेरा जणांवर गुन्हे

जत : शहरातील पारधी तांड्यात पूर्ववैमनस्यातून चौघांना बेदम मारहाण करून अल्पवयीन मुलीसोबत झोंबाझोंबी करून तिचा विनयभंग तसेच दोन चारचाकी वाहनांच्या काचा फोडून नुकसान केले. शुक्रवारी पहाटे २:३० ते ३ वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे. याप्रकरणी १३ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. याबाबत पीडित मुलीने जत पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.पोलिसांनी बसवराज रामचंद्र चव्हाण, देवराज बसवराज चव्हाण, दीपक रामचंद्र चव्हाण, धनजंय दीपक चव्हाण, राकेश आप्पा चव्हाण, हेमलता बसवराज चव्हाण, पूजा देवराज चव्हाण, धानेश्वरी ऊर्फ धनश्री धनंजय चव्हाण, छाया रामचंद्र चव्हाण, पारूबाई आप्पा चव्हाण, कोमल दीपक चव्हाण, जिजाबाई रामचंद्र चव्हाण व अभी धनंजय चव्हाण (सर्व रा. आंबेडकरनगर, उमराणी रोड, पारधी तांडा, जत, ता. जत) अशा तेरा जणांवर विविध कलमांन्वये गुन्हे दाखल केले आहेत.

पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, संशयितांनी फिर्यादीच्या घराचा दरवाजा तोडून, घरात घुसून फिर्यादीसह फिर्यादीचे पती, आई, मुलीस काठ्या, कुऱ्हाडीच्या दांड्याने, लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जखमी केले आहे. फिर्यादीच्या पुतणीसोबत झोंबाझोंबी करून तिला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले आहे.फिर्यादीच्या मदतीकरिता आलेल्या राहुल गोपाळ काळे, राहुल गोंविद चव्हाण, मीनाबाई गोपाळ काळे, पारू राहुल चव्हाण, गोविंद ऊर्फ पवन राजू काळे, रेश्मा शंकर काळे यांनाही काठ्या, कुऱ्हाडीचा दांडा, लोखंडी रॉडने, दगडाने मारहाण करून जखमी केले आहे. तसेच चारचाकी (क्र. एमएच १० डीएल २४२१), चारचाकी (क्र. एमएच ४३ एजे ४८७७)च्या समोरील व पाठीमागील काचा फोडून नुकसान केले आहे. यामध्ये महिलेचे गंठण, दुसरीचे मंगळसूत्र तोडून गहाळ केले आहे. या घटनेची नोंद झाली असून, अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक राजश्री गायकवाड करत आहेत.

टॅग्स :Sangliसांगलीjat-acजाटCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस