शहरं
Join us  
Trending Stories
1
'पुष्पा २' प्रीमियर चेंगराचेंगरी प्रकरणात अभिनेता अल्लू अर्जुनसह २३ जण दोषी, आरोपपत्र दाखल
2
जम्मू काश्मीर: ३० ते ३५ दहशतवादी लपल्याची शंका, बर्फवृष्टीतही भारतीय सैन्याची शोधमोहिम सुरु
3
भररस्त्यात पाठलाग करून मंगेश काळोखेंवर केले २७ वार; आरोपींच्या निर्दयीपणाचे 'सीसीटीव्ही' फुटेज समोर
4
’मंगेश काळोखे यांच्या मारेकऱ्यांवर मोक्का लावून कठोरात कठोर कारवाई करणार’, एकनाथ शिंदे यांचं आश्वासन
5
मैदानातच आला हृदयविकाराचा झटका, प्रसिद्ध प्रशिक्षकाचं निधन, बांगलादेश क्रिकेटवर शोककळा  
6
भाजपा, शिंदेसेनेत युतीसाठी कोणतीही अडचण नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती
7
VIDEO: खतरनाक! समुद्राच्या तळाशी पोहणाऱ्या डायव्हरवर अचानक ऑक्टोपसने केला हल्ला अन् मग...
8
ठाण्यात तीन प्रभागावरून युती अडली; आज तोडगा निघण्याची शक्यता, १२ जागांवरून अडले घोडे
9
Solapur Municipal Election: काँग्रेसने २० उमेदवारांच्या नावाची केली घोषणा, पहिल्या यादीत कुणाची नावे?
10
खोपोलीतील घटना अत्यंत निंदनीय, निषेध करत सुनिल तटकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी
11
"PM मोदींचा हा वन मॅन शो फक्त..."; मनरेगाच्या नामांतरावरून सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल, काँग्रेस ५ जानेवारीपासून रस्त्यावर उतरणार
12
VIDEO : इटलीच्या बॅटरकडून शाहीन आफ्रिदीची धुलाई; पाक गोलंदाजावर 'लंगडी' घालत मैदान सोडण्याची वेळ!
13
शिंदेसेनेच्या बैठकीत राडा? शहरप्रमुख नाना भानगिरे रागारागात बाहेर पडले आणि गेले निघून; व्हिडीओ आला समोर
14
जळगाव: बापच बनला हैवान! चौथी मुलगी झाल्याच्या रागातून अवघ्या ३ दिवसांच्या मुलीची हत्या
15
बांगलादेशमध्ये एका मिस्ट्री गर्लची एंट्री, बनू शकते भविष्यातील शेख हसीना किंवा खलिदा झिया
16
Sukesh Chandrashekhar : "२१७ कोटी देण्यास तयार, पण...", महाठग सुकेश चंद्रशेखरचा मास्टरस्ट्रोक; खंडणी प्रकरणात मोठी ऑफर
17
AUS vs ENG: डोक्यात निवृत्तीचा विचार, मनात भीती… आणि त्यानेच सामना फिरवला!
18
कौतुकास्पद! आईने दागिने विकून शिकवलं, १० वेळा अपयश आलं पण लेकाने वडिलांचं स्वप्न पूर्ण केलं
19
विराट कोहलीचा VIDEO घेण्यासाठी बस ड्रायव्हरची भन्नाट 'आयडिया', सोशल मीडियावर क्लिप VIRAL
20
राजकारण पेटलं! कर्नाटकमध्ये काँग्रेस सरकारची बुलडोझर कारवाई; ४०० हून अधिक घरं पाडली
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीतील चार माजी नगरसेवकांनी राष्ट्रवादी अजित पवार गटात केला प्रवेश 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2025 18:33 IST

मिरजेत आनंदा देवमाने यांची पुन्हा घरवापसी

सांगली : ‘महापालिकेत जिरवाजिरवीचे राजकारण करू नका. विकासकामांना प्राधान्य द्या,’ असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. ते पुण्यात माजी नगरसेवकांच्या पक्षप्रवेश कार्यक्रमात बोलत होते. सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेच्या चार माजी नगरसेवकांनी शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (अजित पवार) प्रवेश केला. पुण्यात शुक्रवारी झालेल्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री पवार यांनी त्यांचे स्वागत केले.माजी नगरसेवक अभिजित भोसले, स्नेहल सावंत, वसीम नायकवडी, सचिन सावंत यांच्यासह रज्जाक नायकवडी यांचे पक्षप्रवेश झाले. यावेळी शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे, माजी महापौर दिग्विजय सूर्यवंशी, माजी नगरसेवक बीरेंद्र थोरात, आदी यावेळी उपस्थित होते.यावेळी पवार म्हणाले, ‘विकासकामांवरून लोकांचे लक्ष हटविणाऱ्या विषयांचे राजकारण आपल्याला अपेक्षित नाही. पुरोगामी विचारसरणीला अनुसरून लोकांच्या हिताची कामे केली पाहिजेत. सांगली, मिरजेतील कामांसाठी चांगला निधी देऊ. तुम्ही महापालिका चांगली चालवा. लोकांचे लक्ष हटवणाऱ्या पाकिस्तान किंवा अन्य विषयांचे राजकारण योग्य नाही. महापालिकेचे बजेट वाढले पाहिजे. लोकांच्या दैनंदिन जीवनमरणाचे महत्त्वाचे विषय मागे पडता कामा नयेत. लोकांचा पाठिंबा मिळविण्यासाठी त्यांची कामे करणे महत्त्वाचे आहे.मिरजेत आनंदा देवमाने यांची पुन्हा घरवापसीमिरज : आठवड्यापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत जनसुराज्य पक्षातून राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षात प्रवेश करणारे मिरजेतील माजी उपमहापौर आनंदा देवमाने यांनी पुन्हा घरवापसी करत जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम यांच्या उपस्थितीत जनसुराज्य पक्षात प्रवेश केला.आनंदा देवमाने गतवेळी भाजपमधून नगरसेवक म्हणून निवडून आले होते. त्यानंतर महापौर निवडणुकीत भाजपशी फारकत घेतली. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर चार महिन्यांपूर्वी आनंदा देवमाने यांनी जनसुराज्य शक्ती पक्षात कार्यकर्त्यांसोबत प्रवेश केला. मात्र, त्यानंतर पुन्हा राजकीय घडामोड होऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मिरज दौऱ्यात मिरजेतील माजी नगरसेवकांसोबत देवमाने यांनी राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षात प्रवेश केला. 

English
हिंदी सारांश
Web Title : Sangli: Four Ex-Corporators Join Ajit Pawar's NCP Faction

Web Summary : Four former corporators from Sangli joined Ajit Pawar's NCP in Pune. Ajit Pawar urged prioritizing development over political maneuvering. Ananda Devmane rejoined Jansurajya Shakti Party after briefly joining NCP.
टॅग्स :Sangli Miraj Kupwad Municipal Corporation Electionसांगली मिरज कुपवड महानगरपालिका निवडणूक २०२६SangliसांगलीMunicipal Electionमहानगरपालिका - नगरपालिका निवडणूक २०२६Ajit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेस