शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीतील सराफाला पावणेचार कोटींचा गंडा, चौघे बंगाली कारागीर पावणेदोन किलो सोन्यासह पसार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2024 13:41 IST

सांगली : दहा वर्षांपासून विश्वास संपादन करून सांगलीतील सराफास तब्बल तीन कोटी ६९ लाख ९७ हजार ९६ रुपयांचा मूळ ...

सांगली : दहा वर्षांपासून विश्वास संपादन करून सांगलीतील सराफास तब्बल तीन कोटी ६९ लाख ९७ हजार ९६ रुपयांचा मूळ पश्चिम बंगालच्या चौघा कारागिरांनी गंडा घातला. दागिने करण्यासाठी सोन्याचे लगड (चोख सोने) घेऊन सोने करून देतो, असे सांगून चौघे संशयित पसार झाले. याबाबत सांगली शहर पोलिस ठाण्यात महेश्वर कांतेश्वर जवळे (रा. ओम सम्मुखा, प्लॉट नं. २, साखर कारखान्यासमोर, माधवनगर रोड, सांगली) यांनी रविवारी फिर्याद नोंदविली आहे.फिर्यादी महेश्वर जवळे यांच्या फिर्यादीनुसार, पोलिसांनी संशयित गौतम गोपाल दास, रुमा गौतम दास, सौरभ गोपाल दास आणि सुभा ऊर्फ सुभो गोविंद दास (सर्व रा. आटपाडी, मूळ गाव गोपानगर, दक्षिणपाडा पूर्व मेदनापूर, पश्चिम बंगाल ) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.महेश्वर जवळे यांचे सराफ पेठेत सोन्या-चांदी दागिने विक्रीचे दुकान आहे. संशयित गौतम दास हा पश्चिम बंगाल येथील कारागीर मागील दहा वर्षांहून अधिक काळापासून आटपाडी येथे राहण्यास आहे. त्याने जिल्ह्यातील अनेक सराफांच्या ओळखी करून घेतल्या होत्या. त्यांच्याकडून चोख सोने घेऊन त्यांना दागिने बनवून देण्याचे काम तो आणि त्याचे कुटुंबीय करीत होते.फिर्यादी महेश्वर जवळे यांची देखील दास याच्याशी ओळख होती. दहा वर्षांपासून दास हा सराफ जवळे यांच्याकडून सोने घेऊन त्यांना दागिने तयार करून देत होता. दरम्यान, दि.३१ जुलै २०२४ ते दि.३० ऑगस्ट २०२४ या कालावधीत फिर्यादी जवळे यांच्याकडून संशयित दास याने तीन कोटी ६९ लाख ९७ हजार ५९६ रुपयांचे एक हजार ७७४ ग्रॅम वजनाचे सोने घेतले होते; मात्र सदर सोने घेऊन चौघे संशयित पसार झाले असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस