Sambhaji Bhide: संभाजी भिडे सायकलवरुन पडले; खुब्याला दुखापत, रुग्णालयात केले दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2022 21:24 IST2022-04-27T21:21:42+5:302022-04-27T21:24:36+5:30
संभाजी भिडे गुरुजी हे नेहमी सायकलवरून प्रवास करतात.

Sambhaji Bhide: संभाजी भिडे सायकलवरुन पडले; खुब्याला दुखापत, रुग्णालयात केले दाखल
सांगली- शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी हे सायकलवरून पडून जखमी झाले असल्याची माहिती समोर आली आहे. संभाजी भिडे यांना खुब्याला दुखापत झाली असून त्यांना उपचारासाठी भारती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. संभाजी भिडे सांगलीतील गणपती मंदिरात दर्शनासाठी जात असताना हा अपघात झाल्याचे समोर येत आहे.
संभाजी भिडे गुरुजी हे नेहमी सायकलवरून प्रवास करतात. नेहमी प्रमाणे ते सायंकाळच्या सुमारास शहरातल्या गणपती मंदिराच्या दर्शनासाठी गेले होते. दर्शन घेऊन बाहेर पडल्यानंतर सायकलवरून ते पुन्हा आपल्या घरी निघाले. मात्र याचदरम्यान काही अंतरावर गेले असता त्यांना अचानकपणे चक्कर आली आणि ते सायकलवरून खाली पडले.
दरम्यान, संभाजी भिडे यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती उत्तम असल्याचे संभाजी भिडे यांच्या जवळच्या नातेवाईकांनी सांगितले. संभाजी भिडे यांना केवळ मुका मार लागला आहे, त्यामुळे घाबरण्याची गरज नसल्याचेही धारकऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.