शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

Sangli Politics: संजयकाका पाटील 'घड्याळा'ची साथ सोडणार?, पुन्हा भाजपचा झेंडा हाती घेणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2025 17:57 IST

सदस्य नोंदणीसाठी बैठक घेतल्याने चर्चा; कार्यकर्ते संभ्रमात

दत्ता पाटीलतासगाव : ऐन विधानसभा निवडणुकीत माजी खासदार संजय पाटील यांनी भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर संजयकाकांची वाटचाल पुन्हा भाजपच्या दिशेने असल्याची चर्चा रंगली आहे. बुधवारी भाजपच्या सदस्य नोंदणीसाठी काका गटाची बैठक झाली. सदस्य नोंदणी जोमाने करण्याचे आवाहन केल्यामुळे संजयकाका घड्याळाची साथ सोडणार असल्याचे बोलले जात आहे. अधिकृतपणे संजय काकांनी भूमिका जाहीर केली नाही. त्यामुळे कार्यकर्ते संभ्रमात असल्याचे चित्र आहे.लोकसभा निवडणुकीत भाजपकडून सलग दोनवेळा विजयी झालेल्या संजयकाकांना तिसऱ्यांदा पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर राजकीय भवितव्यासाठी संजयकाकांनी जिल्ह्याच्या राजकारणावरून पुन्हा स्वतःच्या विधानसभा मतदारसंघावर लक्ष केंद्रित केले. तासगाव कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचे निश्चित केले.महायुतीच्या जागा वाटपाच्या फॉर्मुल्यात हा मतदारसंघ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे असल्यामुळे संजयकाकांनी निवडणुकीच्या तोंडावर भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मात्र या निवडणुकीत देखील त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. सलग दोन पराभवामुळे काकागट ‘बॅकफुट’वर गेला. तर या पराभवानंतर दस्तूरखुद्द संजयकाकांसह त्यांचे पदाधिकारीदेखील सक्रिय नसल्याचे दिसत होते.आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या बाबतीत संजय पाटील कोणती भूमिका घेणार? याची चर्चा होत होती. बुधवारी त्यांच्या कार्यकर्त्यांची बैठक घेतली. या बैठकीत भाजपचे सदस्य नोंदणी अभियान प्रभावीपणे राबविण्याचे आवाहन केले. मतदारसंघात ६० हजार सदस्य नोंदणी पूर्ण झाली पाहिजे, असेही आवाहन संजयकाकांनी केले. या आवाहनानंतर काका गटाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी सदस्य नोंदणीसाठी सुरुवात केली आहे.

अधिकृतपणे संजय पाटील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत. मात्र त्यांनी भाजपच्या सदस्य नोंदणीसाठी आवाहन केले. त्यामुळे संजयकाका पुन्हा एकदा राजकीय भूमिका बदलणार असल्याची चर्चा मतदारसंघात सुरू आहे. विधानसभा निवडणुकीच्या पराभवानंतर संजयकाका पुन्हा भाजपच्या वाटेवर असल्याचे बोलले जात आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी ते पुन्हा भाजपमध्ये परततील अशीही चर्चा आहे. मात्र काका गटाचे कार्यकर्ते त्यांनी कोणतीही भूमिका जाहीर केली नसल्यामुळे अद्याप संभ्रमात असल्याचे दिसून येत आहे

कार्यकर्त्यांची गोंधळाची स्थितीमाजी खासदार संजय पाटील यांचे पुत्र प्रभाकर पाटील यांच्याकडे विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक प्रमुख पदाची जबाबदारी आहे. प्रभाकर पाटील यांच्या नेतृत्वाखालीच सदस्य नोंदणी करण्याचे आवाहन संजयकाकांनी केले आहे. त्यामुळे सद्यस्थितीत वडील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तर मुलगा भाजपमध्ये असे चित्र निर्माण झाले आहे. कार्यकर्त्यांचा संभ्रम कायम राहिला आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कोणता झेंडा हातात घ्यायचा? या गोंधळात कार्यकर्ते दिसून येत आहे.

टॅग्स :Sangliसांगलीtasgaon-kavathe-mahankal-acतासगाव-कवठेमहांकाळsanjaykaka patilसंजयकाका पाटीलNCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवारBJPभाजपा