सांगली : जिल्हा परिषदेतील सत्तास्थापनेला दिवसेंदिवस वेगळे वळण मिळताना दिसत आहे. राष्ट्रवादी (अजित पवार)चे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांच्या भूमिकेवर शंका घेऊन पक्षातील अन्य नेत्यांनी जिल्हा परिषदेतील राष्ट्रवादी सदस्यांना व्हीप बजावण्याचे अधिकार माजी आमदार विलासराव जगताप यांच्याकडे दिले आहेत. शुक्रवारी तसे पत्र जिल्हाधिकारी यांच्याकडे दिले जाणार आहे.राष्ट्रवादी (अजित पवार)च्या नेत्यांमध्ये महायुती आणि महाविकास आघाडीला पाठिंबा देण्यावरून टोकाचा वाद निर्माण झाला आहे. पक्षाचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील, माजी आमदार शिवाजीराव नाईक यांचा महायुतीला पाठिंबा देण्याकडे कल आहे; पण पाटील व नाईक यांच्या भूमिकेला पक्षातील माजी आमदार विलासराव जगताप, राजेंद्रअण्णा देशमुख, माजी मंत्री अजितराव घोरपडे, माजी खासदार संजय पाटील यांनी तीव्र शब्दांत विरोध केला आहे. या नाराज नेत्यांची गुरुवारी बैठक झाली आहे.या बैठकीमध्ये जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडणुकीवेळी सदस्यांना व्हीप बजावण्याचा अधिकार विलासराव जगताप यांना देण्याचा निर्णय झाला. यासंबंधीचे पत्रही शुक्रवारी जिल्हाधिकारी यांच्याकडे देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाला निशिकांत पाटील यांनी विरोध केल्यास पक्षांमध्ये बंड होण्याची शक्यता आहे.
गटनेतापदावर राजेश्वरी नाईकचजिल्हा परिषदेतील राष्ट्रवादी (अजित पवार)च्या सदस्यांना व्हीप बजावण्यावरून नवा वाद उफाळून आला आहे. गटनेता म्हणून सदस्या राजेश्वरी नाईक यांच्याकडे व्हीप बजावण्याचा अधिकार वगळून तो थेट पक्षाच्या जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांना दिले होते. निशिकांत पाटील यांच्या या भूमिकेवर पक्षातील नेते माजी खासदार संजय पाटील, माजी आमदार विलासराव जगताप, राजेंद्रअण्णा देशमुख, माजी मंत्री अजितराव घोरपडे यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. आता व्हीपचे अधिकार राजेश्वरी नाईक यांनाही न देण्याचा पक्षाच्या नेत्यांनी निर्णय घेतला आहे. नाईक यांच्याकडे केवळ गटनेतेपदच असणार आहे.
भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी फिल्डिंगजिल्हा परिषदेमध्ये भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी राष्ट्रवादी (अजित पवार)च्या नेत्यांनी जोरदार फिल्डिंग लावली आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये भाजपला सत्तेत येऊ द्यायचे नाही, म्हणूनच व्हीपचे अधिकार माजी आमदार विलासराव जगताप यांच्याकडे देण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रवादी (अजित पवार)च्या काही सदस्यांनी गैरहजर राहण्याचीही तयारी ठेवली आहे. यासाठी पूर्वी भाजपमध्ये असलेले आणि सध्या राष्ट्रवादी (अजित पवार)त असलेल्या नेत्यांनी जोरदार फिल्डिंग लावली आहे.
Web Summary : Internal disputes in NCP (Ajit Pawar) led to Vilasrao Jagtap receiving whip authority for Sangli ZP members. This move aims to thwart BJP's power bid amid disagreements over alliances and potential defections.
Web Summary : राकांपा (अजित पवार) में आंतरिक विवाद के कारण विलासराव जगताप को सांगली ZP सदस्यों के लिए व्हिप का अधिकार मिला। इस कदम का उद्देश्य गठबंधन और संभावित दलबदल पर असहमति के बीच भाजपा की सत्ता बोली को विफल करना है।