शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: इस्लामपूर मतदारसंघात भाजपकडून धक्कातंत्र, अण्णासाहेब डांगे यांची घरवापसी; जयंत पाटलांच्या भूमिकेकडे लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2025 19:33 IST

घडामोडींवरून इस्लामपूर-शिराळा मतदारसंघात राजकीय तर्क-वितर्क लढवले जात आहेत

अशोक पाटीलइस्लामपूर : माजी मंत्री आण्णासाहेब डांगे आणि त्यांचे पुत्र ॲड. चिमण डांगे, विश्वास डांगे यांचा भाजप प्रवेश बुधवार दि. ३० रोजी मुंबई येथे होणार आहे. या प्रवेश कार्यक्रमातून इस्लामपूर मतदारसंघात भाजपने धक्कातंत्र सुरू केले असून आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या घडामोडींवरून इस्लामपूर-शिराळा मतदारसंघात राजकीय तर्क-वितर्क लढवले जात आहेत.माजी मंत्री अण्णासाहेब डांगे पूर्वी भाजपमध्ये होते. ते घरवापसी करत आहेत. त्यांच्यासोबत त्यांचे पुत्र माजी नगराध्यक्ष ॲड. चिमण डांगे, नगरसेवक विश्वास डांगे आणि त्याचे विश्वासू समर्थक ३० जुलैला मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजप प्रवेश करणार असल्याचे खात्रीशीर वृत्त आहे. याला डांगे समर्थकांनी दुजोराही दिला आहे.गेल्या महिनाभरापासून डांगे यांच्या घरवापसीची चर्चा सुरू होती. अखेर प्रवेशाला मुहूर्त सापडला. परंतु, डांगे यांच्यानंतर आता जयंत पाटील यांच्या भूमिकेविषयी चर्चा सुरू झाली आहे. गेल्या दोन दिवसांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट, त्यानंतर दिल्ली येथील सहकार पुरस्काराच्या निमित्ताने संरक्षणमंत्री अमित शहा यांच्याशी त्यांची भेट झाल्याच्या चर्चेला उधाण आले आहे.जयंत पाटील यांच्या राजकारणाचा पाया संस्थात्मक बांधणीवर उभा आहे. त्याखालोखाल इस्लामपूर मतदारसंघात शैक्षणिक, सहकारच्या माध्यमातून अण्णासाहेब डांगे यांनी संस्थात्मक जाळे विणले आहे. डांगे यांचे विचार पूर्वीपासूनच भाजपशी मिळतेजुळते आहेत. अहिल्याबाई होळकर यांचे जन्मस्थान असलेल्या चौंडी (जि. अहमदनगर) येथील विकासात्मक चळवळीत त्यांनी पुढाकार घेतला होता. ॲड. चिमण डांगे धनगर समाजाचे नेतृत्व करत आहेत. भाजपने इस्लामपूर मतदारसंघात आता त्यांच्या पक्षप्रवेशाच्या माध्यमातून राजकीय धक्कातंत्र अवलंबिले आहे.

भाजप प्रवेशासंदर्भात आमदार जयंत पाटील यांच्याबरोबर वेळोवेळी चर्चा झाली आहे. याबाबत आपण एकत्रित विचार करू, असा सबुरीचा सल्ला जयंत पाटील यांनी दिला. परंतु, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेला शब्द आम्ही पाळणार आहोत. बुधवारी ३० जुलै रोजी मुंबई येथे प्रवेश कार्यक्रम होणार आहे. - ॲड. चिमण डांगे, माजी नगराध्यक्ष, इस्लामपूर, नगर परिषद.