शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

Sangli Politics: अजितराव घोरपडे हाती घड्याळ बांधणार, कार्यकर्त्यांना कामाला लागण्याच्या सूचना 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2025 19:35 IST

आपापल्या मतदारसंघात मोर्चेबांधणी करा

महेश देसाईकवठेमहांकाळ : माजी मंत्री अजितराव घोरपडे यांनी मिरज येथे शुक्रवारी कार्यकर्त्यांच्या बैठकीत आगामी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी रणशिंग फुकले आहे. आगामी निवडणूक या अजित पवार गटाच्या घड्याळ चिन्हावरच लढण्याचा निर्धार केला आहे, तर कार्यकर्त्यांना गावागावात अजित पवार यांचा गट वाढवण्यासाठी कामाला लागण्याच्या सूचना दिल्या आहेत. घोरपडे हे जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका स्वबळावर लढवणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.शुक्रवारी मिरज येथे बाजार समितीच्या सभागृहात सायंकाळी माजी मंत्री अजितराव घोरपडे यांनी कवठेमहांकाळसह मिरज भागातील कार्यकर्त्यांची बैठक आयोजित केली होती. त्या बैठकीत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हा अध्यक्ष निशिकांत पाटील यांचा सत्कार ही आयोजित करण्यात आला होता; परंतु ते काही कामानिमित्त या कार्यक्रमास उपस्थित राहू शकले नाहीत; परंतु कार्यकर्त्यांची बैठक झाली. या बैठकीत आमदार इंद्रिस नायकवडी, पद्माकर जगदाळे, कवठेमहांकाळच्या माजी नगराध्यक्षा साधना कांबळे उपस्थित होत्या.घोरपडे यांनी या बैठकीत आपल्या भाषणात कार्यकर्त्यांना जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्वतंत्र लढण्याचा इशारा देत कार्यकर्त्यांना आपापल्या गावात शाखा काढण्याचे आदेशही दिले, तसेच त्यांनी काही पदाधिकारी यांच्या निवडी तसेच महिला आघाडीच्या ही निवडी लवकरच करणार असल्याचे सांगितले. एकंदरीत या बैठकीमुळे कवठेमहांकाळ तालुक्यासह मिरज पूर्व भागात माजी मंत्री अजितराव घोरपडे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तयारीत राहण्याचे आवाहन केल्याचे दिसून येत आहे. इच्छुकांनी आपापल्या मतदारसंघात मोर्चे बांधणी करण्याचे संकेत दिले.अजितराव घोरपडे हे एकंदरीत उपमुख्यमंत्री अजित पवार गटातूनच आगामी निवडणुकीसाठी शड्डू मारणार हे मिरज येथील बैठकीतून जवळपास दिसून आले आहे. त्यामुळे आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत घोरपडे घड्याळ चिन्हवरच निवडणूक लढणार, हे मात्र निश्चित झाले आहे.

टॅग्स :Sangliसांगलीtasgaon-kavathe-mahankal-acतासगाव-कवठेमहांकाळAjitrao Ghorpadeअजितराव घोरपडेNCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवार