शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत जयंत पाटील यांना धक्का; माजी महापौर, नगरसेवक अजित पवार गटात

By अविनाश कोळी | Updated: January 29, 2024 14:03 IST

महापालिका क्षेत्रात मोठी पडझड

सांगली : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांचे कट्टर समर्थक असलेले माजी महापौर सुरेश पाटील यांच्यासह तीन माजी नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेत पक्षप्रवेशावर शिक्कामोर्तब केले. महापालिका क्षेत्रात जयंत पाटील यांच्या गटाची मोठी पडझड गेल्या काही दिवसांत झाल्याने त्यांच्यासाठी हा मोठा धक्का आहे.कोल्हापूर येथे सोमवारी अजित पवार आले असताना सांगलीतील माजी महापाैर व नगरसेवकांनी भेट घेतली. यामध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष व माजी महापौर सुरेश पाटील, माजी नगरसेवक हणमंत पवार, विष्णु माने, गजानन मगदुम यांनी भेट घेतली. त्यांच्यासमवेत अजित पवार गटाचे सांगली शहर जिल्हाध्यक्ष प्रा. पद्माकर जगदाळे तसेच माजी महापौर दिग्विजय सूर्यवंशी उपस्थित होते.सुरेश पाटील, विष्णू माने हे जयंत पाटील यांचे कट्टर समर्थक मानले जातात. त्यांच्या या प्रवेशाने जयंत पाटील यांच्या गटाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे चार माजी महापौर व अनेक माजी नगरसेवक अजित पवार गटात सहभागी झाले आहेत. त्यामुळे महापाालिका क्षेत्रात जयंत पाटील यांच्या गटाची मोठी पडझड झाली आहे. आणखी काही माजी नगरसेवक आमच्याकडे येण्यासाठी तयार आहेत, असे शहर जिल्हाध्यक्ष जगदाळे यांनी सांगितले. फेब्रुवारी महिन्यात अजित पवार यांच्या उपस्थितीत सांगलीत कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. यावेळीही मोठ्या प्रमाणावर पक्षप्रवेश होण्याचे संकेत स्थानिक पदाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

टॅग्स :SangliसांगलीNCPराष्ट्रवादी काँग्रेसJayant Patilजयंत पाटीलAjit Pawarअजित पवार