शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
5
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
6
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
7
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
8
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
9
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
10
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
11
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
12
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
13
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
14
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
15
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
16
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
17
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
18
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
19
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
20
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला

Sangli: वसंतदादा पाटील यांच्या नातसून जयश्रीताई पाटील भाजपमध्ये, अजितदादांना शह

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2025 13:14 IST

जयश्रीताईंना पालकमंत्री भेटले; दोन दिवसात प्रवेशाचे ठरले : काँग्रेसला मोठा धक्का

सांगली : माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या नातसून व जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षा जयश्रीताई पाटील यांच्या निवासस्थानी सोमवारी भाजपचे नेते तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी भेट देत त्यांच्या भाजप प्रवेशावर शिक्कामोर्तब केला. दोन दिवसांत मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत त्यांचा अधिकृत भाजप प्रवेश होणार आहे.सोमवारी सकाळी पालकमंत्री पाटील, भाजपचे आमदार सुधीर गाडगीळ, भाजपचे पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री मकरंद देशपांडे, जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक, जनसुराज्यचे नेते समित कदम, भाजपचे शेखर इनामदार, सी. बी. पाटील, आदींनी जयश्रीताई पाटील यांच्या निवासस्थानी भेट दिली. यावेळी पक्ष प्रवेशाबाबत त्यांनी चर्चा केली. पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेश निश्चित झाला.

सांगलीच्या राजकारणात दिवंगत मदन पाटील यांचा स्वतंत्र गट कार्यरत आहे. काँग्रेसअंतर्गत आतापर्यंत हा गट सक्रिय होता. विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाने दिवंगत माजी मंत्री मदन पाटील गटाच्या नेत्या, जयश्रीताई पाटील यांना उमेदवारी दिली नव्हती. त्यामुळे त्यांनी बंडखोरी करीत अपक्ष निवडणूक लढवली होती. यानंतर काँग्रेसने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली. पाटील यांनी वेगळी राजकीय वाटचाल सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. काही दिवसांपूर्वीच त्यांनी कार्यकर्त्यांची मते जाणून घेतली. यावेळी त्यांना भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसची ऑफर होती. अखेर त्यांनी भाजपमध्ये प्रवेशाचा निर्णय घेतला.महापालिकेच्या निवडणुकीपूर्वी मदनभाऊ गट भाजपबरोबर यावा, यासाठी प्रदेश पातळीवरील भाजपच्या नेत्यांनी जयश्रीताई पाटील यांना संपर्क केला होता. त्यांच्याशी चर्चेनंतर जयश्रीताई यांचा भाजपमध्ये प्रवेश निश्चित झाला आहे.

जयश्रीताई विचार करून निर्णय घ्या : अजित पवार यांचा निरोपउपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही तुमच्या अडचणी सोडविण्याबरोबरच महापालिका क्षेत्रात पक्षाचे नेतृत्व देण्याचा शब्द दिला होता. अखेरच्या टप्प्यात चर्चा केल्याविना कोणताही निर्णय घाईने घेऊ नका, असाही निरोप रविवारी जयश्रीताई पाटील यांना अजित पवार यांनी दिला होता. अखेर भाजपची चाणक्य नीती कामी आली. जयश्रीताई यांनी भाजपमध्येच प्रवेश करावा, यासाठी भाजपचे पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री मकरंद देशपांडे यांनीही निर्णायक भूमिका बजावली.

कार्यकर्त्यांचा सन्मान राखणार : चंद्रकांत पाटीलकार्यकर्त्यांचा सन्मान राखण्याबरोबरच या गटाला निर्णय प्रक्रियेत सहभागी करून घेण्याचा शब्द पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे. जिल्हा नियोजन मंडळाच्या दोन जागा आणि वसंतदादा शेतकरी बँकेच्या चौकशीचा ससेमिरा थोपविण्याबरोबरच रिक्त असलेल्या सांगली, सातारा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधान परिषदेसाठी उमेदवारी देण्याचा भाजप नेत्यांनी शब्द दिल्याची चर्चा आहे.

भाजपकडून अजितदादांना शहजयश्रीताई पाटील यांनी आपल्या पक्षात यावे यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यांच्यात चढाओढ सुरू होती. अखेर भाजपने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मनसुब्यांना एक प्रकारे शह देत महायुतीमध्ये आपणच मोठा भाऊ असल्याचे दाखवून दिले.