Sangli News: परदेशी पाहुणे आले, आश्रमशाळा पाहून हरखले!, स्वर्गीय गोपीनाथ मुंडे शाळेला मदतीची ग्वाही
By श्रीनिवास नागे | Updated: February 10, 2023 17:51 IST2023-02-10T17:50:50+5:302023-02-10T17:51:44+5:30
वंचित भागातील विद्यार्थी ढगेवाडी येथील आश्रम शाळेत शिक्षण घेत आहेत

Sangli News: परदेशी पाहुणे आले, आश्रमशाळा पाहून हरखले!, स्वर्गीय गोपीनाथ मुंडे शाळेला मदतीची ग्वाही
शिराळा (सांगली) : ढगेवाडी (ता. वाळवा) येथे स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडे प्राथमिक आश्रमशाळेस हॉलंडच्या परदेशी पाहुण्यांनी भेट देऊन चिमुकल्यांशी संवाद साधला. शाळा पाहून परदेशी पाहुणे हरखून गेले.
सांगली जिल्ह्याच्या पश्चिम भागातील चांदोली धरण परिसरातील, कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील दुर्गम भागात जेथे शिक्षणाची सोय नाही, अशा डोंगर माथ्यावरील धनगर वाचा, आळतूर, पुसाई धनगरवाडा, विठलाई धनगरवाडा, खुंदलापूर धनगरवाडा, राघुचा धनगरवाडा अशा वंचित भागातील विद्यार्थी ढगेवाडी येथील आश्रम शाळेत शिक्षण घेत आहेत.
हॉलंडचे रॉब टॉमपाँट, मोनिका मुशेत ,जॅक बेकर, ज्याको यांनी सांगली येथील येरळा प्रोजेक्टचे सचिव नारायण देशपांडे, सुजाता देशपांडे, आप्पा वेळापूरकर, मिलिंद कुलकर्णी, अपर्णा कुंटे यांच्यासोबत ढगेवाडी आश्रम शाळेस भेट दिली. यावेळी संस्थेचे संस्थापक मारुती पवार, तानाजी पवार यांनी स्वागत केले. या शाळेत भेटलेल्या चिमुकल्या मुलांमधील बदल पाहून पाहुण्यांनी आनंद व्यक्त केला. येथील शैक्षणिक उपक्रमास मदत करण्याची ग्वाही दिली.
हॉलंडचे परदेश पाहुणे जॅक बेकर यांनी डच भाषेत विद्यार्थ्यांशी संवाद साधला, तर रॉब टाँमपाँट यांनी इंग्रजी भाषेत त्याचे संभाषण केले. नारायण देशपांडे यांना मनोगत व्यक्त करताना त्याचे मराठी भाषेत रूपांतर केले.
मुख्याध्यापक धन्यकुमार कोल्हे यांनी स्वागत, एस. पी. पाटील यांनी प्रास्ताविक, अनिल नलवडे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. डी. डी. कासार यांनी आभार मानले.