शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

मृत व्यक्ती जिवंत दाखवून चक्क जमिनीची विक्री, पाच जणांवर गुन्हा; सांगली जिल्ह्यातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2025 12:56 IST

अथणी : अनंतपूर (ता. अथणी) येथील शिवाप्पा रायाप्पा चनवीर हे ४५ वर्षांपूर्वी मृत झाले असताना ते जिवंत असल्याचे भासवून ...

अथणी : अनंतपूर (ता. अथणी) येथील शिवाप्पा रायाप्पा चनवीर हे ४५ वर्षांपूर्वी मृत झाले असताना ते जिवंत असल्याचे भासवून १९ जुलै २०२३ रोजी त्यांची १३ एकर ३० गुंठे जमीन नावे खरेदी केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. डोंगरसोनी (ता. तासगाव) येथील अशोक रामाप्पा माने यांनी ही जमीन खरेदी केली आहे. चनवीर यांचे नातू संतोष विश्वनाथ चनवीर यांनी अथणी पोलिस ठाण्याला फिर्याद दिली आहे. जमीन लाटणाऱ्या पाच जणांच्या टोळीविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.अथणी पोलिसांनी दिलेली माहिती अशी, फिर्यादी संतोष चनवीर (मूळ रा. अनंतपूर, सध्या रा. शिवकमलनगर पुणे) यांची अनंतपूर येथे तेरा एकर तीस गुंठे जमीन आजोबा शिवाप्पा रायाप्पा चनवीर यांच्या नावे आहे. शिवाप्पा चनवीर १९८० मध्ये मरण पावले आहेत. संतोषचे वडील विश्वनाथ चनवीर १९८४ मध्ये उदरनिर्वाहासाठी पुणे येथे स्थायिक झाले.२०२३ पर्यंत संतोष यांच्या आजोबांच्या नावे असलेली जमीन चनवीर कुटुंबाच्या नावे नोंद आहे. संतोष हे आजोबांच्या संपत्तीचे वारसदार आहेत. परंतु नुकतेच त्यांनी जमिनीचा दाखला काढल्यानंतर जमिनीची परस्पर विक्री झाल्याचे दिसून आले. मृत आजोबा जिवंत असल्याचे दाखवून सदरची जमीन दि. १९ जुलै २०२३ रोजी खोटे खरेदीपत्र तयार विक्री केल्याची नोंद केली आहे. जमीन विक्रीसाठी बनावट आधार कार्ड व कागदपत्रे बनवली गेली.संतोष चनवीर यांनी केलेल्या चौकशीत डोंगरसोनी (ता. तासगाव) येथील अशोक माने यांनी जमीन खरेदी केली आहे. गौरगाव (ता. तासगाव) येथील खोटा पत्ता शिवाप्पा रायाप्पा चनवीर यांच्या नावावर दाखवला आहे. डोंगरसोनी गावातीलच पंकज राजाराम पाटील, संतोष प्रताप झांबरे यांनी अथणी येथे नोंदणी कार्यालयात साक्षीदार म्हणून सही केली आहे. अथणी येथील खरेदी दस्त लिहून तयार केल्यानंतर तहसीलदार कार्यालयामध्ये खरेदी दस्त कायम केला आहे.संतोष यांनी महसूल अधिकारी, गाव कामगार तलाठी, वरिष्ठ अधिकाऱ्यांना हा प्रकार निदर्शनास आणून दिला. परंतु कोणतीही कारवाई न झाल्याने पाच जणांविरुद्ध तसेच आणखी काही संशयितांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा अथणी पोलिस ठाण्यात दाखल केला आहे.

अथणी पोलिसांकडून शोधअथणी पोलिसांनी गुन्हा दाखल झाल्यानंतर संशयित आरोपीच्या शोधासाठी तासगाव तालुक्यात छापे मारले आहेत. बोगसगिरी करणाऱ्यांवर पोलिस कोणती कारवाई करणार? याकडे लक्ष लागले आहे.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस