Sangli: ‘ताकारी’चे पहिले आवर्तन तब्बल ५० दिवसांनंतर बंद, दुसरे आवर्तन कधी सुरु होणार..जाणून घ्या
By हणमंत पाटील | Updated: December 27, 2023 19:19 IST2023-12-27T19:19:43+5:302023-12-27T19:19:56+5:30
अजूनही ताकारी योजनेच्या माध्यमातून ३.७ टीएमसी पाणी उचलणे बाकी

Sangli: ‘ताकारी’चे पहिले आवर्तन तब्बल ५० दिवसांनंतर बंद, दुसरे आवर्तन कधी सुरु होणार..जाणून घ्या
अतुल जाधव
देवराष्ट्रे : ताकारी योजनेचे पहिले आवर्तन तब्बल ५० दिवसांनंतर बुधवारी बंद करण्यात आले. यानंतर दुसरे आवर्तन २० जानेवारीला सुरू होईल, अशी माहिती ताकारी योजनेचे कार्यकारी अभियंता राजन डवरी यांनी दिली.
ताकारी योजनेचे पहिले आवर्तन ५ नोव्हेंबर रोजी सुरू करण्यात आले. आवर्तन सुरू झाल्यानंतर अनेक वेळा तांत्रिक बिघाड व अवकाळी पावसामुळे योजना बंद ठेवावी लागली. त्यामुळे ३५ दिवस चालणारे आवर्तन तब्बल ५० दिवस चालवावे लागले. या कालावधीत कृष्णा नदीतून एक पॉइंट एक टीएमसी पाणी उचलण्यात आले. या माध्यमातून ताकारी योजनेच्या सर्व लाभक्षेत्राला भरपूर प्रमाणात पाणी उपलब्ध झाले आहे.
अजूनही ताकारी योजनेच्या माध्यमातून ३.७ टीएमसी पाणी उचलणे बाकी आहे. पुढील आवर्तन २० जानेवारीच्या दरम्यान सुरू होईल, असे डवरी यांनी सांगितले. त्यामुळे पुढील अवर्तनासाठी शेतकऱ्यांना तीन आठवडे प्रतीक्षा करावी लागणार आहे.