शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत पहिले पंचतत्त्व साहित्य संमेलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 04:25 IST

सांगली : जल, अग्नी, पृथ्वी, वायू आणि आकाश या पंचमहातत्त्वांचे महत्त्व आणि माहात्म्य समाजापर्यंत नेण्यासाठी श्री महाराज पंचतत्त्व सेवा ...

सांगली :

जल, अग्नी, पृथ्वी, वायू आणि आकाश या पंचमहातत्त्वांचे महत्त्व आणि माहात्म्य समाजापर्यंत नेण्यासाठी श्री महाराज पंचतत्त्व सेवा प्रतिष्ठानच्या वतीने सांगलीत पहिल्यांदाच पंचतत्त्व साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. कर्नाळ रोडवरील पंचतत्त्व मंदिर येथे दुपारी तीन वाजता हे संमेलन होणार असल्याचे पोळ यांनी सांगितले.

शनिवार, २३ जानेवारी रोजी होणाऱ्या संमेलनामध्ये पंचतत्त्व पुरस्कार दिले जाणार आहेत. प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र पोळ यांनी सांगितले की, जल, अग्नी, पृथ्वी, वायू आणि आकाश या पंचमहातत्त्वांची नव्याने ओळख व्हावी, त्याबाबतचा अभ्यास होऊन त्याचा व्यक्ती आणि समाज कल्यासाठी उपयोग करून घेता यावा, यासाठी साहित्यिकांची भूमिकाही महत्त्वाची आहे. यासाठीच या संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.

यानिमित्ताने पंचतत्त्व सेवा पुरस्कारांचेही वितरण करण्यात येणार आहे. आकाशदेवता रंगभूमी पुरस्कार संपत कदम यांना, अग्निदेवता समाजसेवा पुरस्कार अर्चना मुळे यांना, वायुदेवता आरोग्य सेवा पुरस्कार महापालिका आरोग्य अधिकारी डॉ. रवींद्र ताटे यांना, जलदेवता साहित्य सेवा पुरस्कार सचिन पाटील यांना, तर पृथ्वीदेवता वसुंधरा सेवा पुरस्कार अ‍ॅनिमल राहतचे कार्यकर्ते कौस्तुभ पोळ यांना प्रदान करण्यात येणार आहे. संमेलनास अ‍ॅड. श्याम जाधव, विजय कडणे, प्रा. भरतेश्वर पाटील, मुकुंद पटवर्धन, कुलदीप देवकुळे आदी उपस्थित राहणार आहेत.