शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: जिल्हा परिषद शाळेतील पोरच हुशार; पहिलीचे विद्यार्थी करतात तब्बल हजारपर्यंत बेरीज-वजाबाकी अन् इंग्रजी स्पेलिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2025 15:49 IST

हणमंतनगरची नावीन्यपूर्ण शाळा : इंग्रजी स्पेलिंगही काही सेकंदात

कडेगाव : इयत्ता पहिलीतील विद्यार्थ्यांनी हजारपर्यंत बेरीज-वजाबाकी, कृतीयुक्त बाराखडी नव्हे तर सोळाखडी आणि इंग्रजी स्पेलिंग अवघ्या काही सेकंदांत सादर करून सर्वांनाच अचंबित केले. विद्यार्थ्यांनी गटविकास अधिकारी प्रशांत राऊत, सहायक गटविकास अधिकारी जालिंदर वाजे आणि विस्तार अधिकारी सुनील लोहार आदी अधिकाऱ्यांचे स्वागतही इंग्रजीतून केले.कडेगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी राऊत यांनी हणमंतनगर-चिंचणी (ता. कडेगाव) येथील जिल्हा परिषद प्राथमिक डिजिटल सेमी इंग्रजी शाळेस भेट देऊन शाळेतील नावीन्यपूर्ण उपक्रमांचा आढावा घेतला.मुख्याध्यापिका माया कुंभार यांनी शाळेतील विविध शैक्षणिक उपक्रमांची सविस्तर माहिती दिली. तसेच उपक्रमशील शिक्षक रामलिंग खाडे यांनी घेतलेल्या नावीन्यपूर्ण उपक्रमांचे थेट प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांकडून सादर करून दाखवले. राऊत यांनी विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास, शिक्षकांचा उपक्रमशील दृष्टिकोन आणि शाळेतील गुणवत्ता पाहून समाधान व्यक्त केले. तसेच अशा शाळा इतरांसाठी प्रेरणादायी ठरतील असा विश्वास व्यक्त करत शिक्षक आणि विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

धनुर्विद्या प्रशिक्षण उपक्रमाचे कौतुकहणमंतनगर शाळा महाराष्ट्रातील पहिली जिल्हा परिषद शाळा आहे, जिथे विद्यार्थ्यांना धनुर्विद्या शिकवली जाते. या आगळ्यावेगळ्या उपक्रमामुळे संपूर्ण जिल्ह्यात शाळेची विशेष ओळख निर्माण झाली आहे. अधिकाऱ्यांनी या उपक्रमाचे मनःपूर्वक कौतुक केले आणि हा नवा प्रयोग ग्रामीण भागातील शाळांसाठी दिशादर्शक ठरेल, असे गौरवोद्गार काढले.

रामलिंग खाडे यांचे कौतुक या शाळेतील उपक्रम शिक्षक रामलिंग खाडे हे एमए, एमएड. आहेत. धनुर्विद्या क्रीडा प्रकारातील राष्ट्रीय खेळाडू आहेत. त्यांनी या शाळेत शालेय शिक्षण व क्रीडा प्रकारात राबविलेले उपक्रम विद्यार्थी, पालक आणि संपूर्ण समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहेत. त्यांचे अध्यापन कौशल्य व आधुनिक शिक्षणाच्या दिशेने हणमंतनगर शाळेने उचललेले पाऊल खरंच कौतुकास्पद आहे, असे प्रशांत राऊत म्हणाले.

टॅग्स :Sangliसांगलीzpजिल्हा परिषदSchoolशाळाStudentविद्यार्थी