शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

Sangli: विट्यात फटाक्यांच्या गोदामाला आग, वृद्धेचा होरपळून मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2025 13:42 IST

भरवस्तीतील घटना, सहाजण गंभीर जखमी; नागरिकांच्या सतर्कतेने मोठी जीवितहानी टळली

विटा : येथील यशवंतनगर उपनगरातील भरवस्तीत असलेल्या दत्तात्रय तारळकर यांच्या राहत्या घरातील फटाक्यांच्या गोदामाला अचानक लागलेल्या आगीत त्यांच्या वृद्ध आई कलावती शिवदास तारळकर यांचा होरपळून मृत्यू झाला. या भीषण घटनेत दत्ता तारळकर यांच्यासह सहाजण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना बुधवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास यशवंतनगर येथे घडली. भरवस्तीत घडलेल्या या घटनेने नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.विटा येथील भाजपचे शहराध्यक्ष दत्तात्रय शिवदास तारळकर यांचा यशवंतनगर येथे गेल्या अनेक वर्षांपासून फटाक्यांचा व्यवसाय आहे. त्यांच्या राहत्या घरीच फटाक्यांचे गोदाम आहे. बुधवारी दुपारी अचानक फटाक्याच्या गोदामाला आग लागली. ही आग इतकी भीषण होती की, बेडरूममध्ये झोपलेल्या त्यांच्या आई कलावती शिवदास तारळकर यांचा भाजून गंभीर जखमी झाल्याने मृत्यू झाला. या आगीत दत्तात्रय शिवदास तारळकर (वय ५६), योगिता शंकर पवार (३०), मानसी शंकर पवार (१५), वर्षा दत्तात्रय तारळकर (५२), दीपाली दत्तात्रय तारळकर (२८), कल्पना विजय जाधव (३५) असे सहाजण गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर सांगलीच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आग लागल्यानंतर शेजारचे नागरिक तातडीने घटनास्थळी जाऊन घरातील लोकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करीत होते. परंतु, धुराचे लोट आणि जाळ यांमुळे लोकांना बाहेर काढताना अडचण निर्माण होत होती. या घटनेनंतर पोलिस उपअधीक्षक विपुल पाटील, निरीक्षक धनंजय फडतरे यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी जाऊन बचावकार्य सुरू केले होते. या आगीत तारळकर यांच्या घरातील सर्व संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले. या घटनेची नोंद विटा पोलिसांत झाली असून आगीचे नेमके कारण समजू शकले नाही.

नागरिकांच्या सतर्कतेने मोठी जीवितहानी टळलीदत्तात्रय तारळकर यांच्यासह घरात अडकलेल्या सदस्यांना नागरीकांनी जीवाची बाजी लावून बाहेर काढले. परंतु, तोपर्यंत सहा जण भाजून गंभीर जखमी झाले होते. या घटनेची माहिती मिळताच विटा नगरपालीकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी जाऊन आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. चार ते पाच तासाच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली.

टॅग्स :Sangliसांगलीfireआग