शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: रस्त्याच्या वादातून बुधगावात हाणामारी, अठराजणांवर गुन्हे; पिस्तूल, तलवारीचा वापर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2025 16:38 IST

सांगली : बुधगाव (ता. मिरज) येथे मंगळवारी रात्री झालेल्या तुफान हाणामारीप्रकरणी पाटील व गोसावी गटांतील सुमारे १८ जणांविरोधात सांगलीत ...

सांगली : बुधगाव (ता. मिरज) येथे मंगळवारी रात्री झालेल्या तुफान हाणामारीप्रकरणी पाटील व गोसावी गटांतील सुमारे १८ जणांविरोधात सांगलीत ग्रामीण पोलिसांत गुन्हे दाखल झाले आहेत. हाणामारीसाठी पिस्तूल आणि रिव्हॉल्व्हरचा वापर झाल्याचे दोन्ही गटांनी म्हटले आहे. त्यांनी परस्परविरोधात तक्रारी दिल्या आहेत.पाटील गटातर्फे ग्रामपंचायत सदस्य अविनाश विक्रम पाटील (वय ३०) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार गुन्हे दाखल झालेले संशयित असे : विजय (मेजर) गोसावी, अजय गोसावी, सूरज गोसावी, सागर गोसावी, मुकेश गोसावी, संदीप गोसावी, प्रकाश गोसावी, सुखदेव गोसावी (सर्व रा. बुधगाव). गोसावी गटातर्फे सूरज विजय गोसावी (वय ३६, रा. बुधगाव) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार संशयित असे : मनोहर पाटील, संभाजी पाटील, पवन पाटील, अविनाश पाटील, संदीप निकम, विनायक शिंदे, ऋषभ पाटील व अन्य दोन ते तीन अनोळखी (सर्व. रा. बुधगाव). मंगळवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास राजवाडा परिसरात हाणामारी झाली होती. अविनाश पाटील यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, गोसावी गटाने जीवे मारण्याच्या उद्देशाने हल्ला केला. बेकायदा जमाव जमवून संभाजी पाटील यांच्या डोळ्यावर काठीने वार केले. मनोहर पाटील यांनाही काठीने मारहाण केली. प्रकास गोसावी याने डोक्यात बाटलीने वार केला. संदीप गोसावी याने कोयत्याने डोक्यात वार केला. त्याच्याकडील पिस्तूल घेऊन अंगावर धावून आला.

सूरज गोसावी यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, पाटील गटातील संशयितांनी बेकायदा जमाव जमवून आपल्यावर हल्ला केला. बहीण उज्ज्वला हिला शिवीगाळ व दमदाटी केली. डोक्याला रिव्हॉल्व्हर लावून धमकावले. पाठीवर तलवारीने वार करून जखमी केले. सूरज हे मनोहर पाटील यांना ‘रस्त्यावरील पाणी आमच्या दुकानापर्यंत येऊ नये, असा रस्ता कर’ असे सांगत असताना त्यानेही अश्लील शिवीगाळ करत धमकावले.दरम्यान, पोलिसांनी दोन्ही गटांतील संशयितांना ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. गावात बंदोबस्त ठेवला आहे. भारतीय न्याय संहिता ११८ (१), ११८ (२), १८९ (२), १८९ (४), १९०, १९१(२), १९१ (३), ११५ (२), ७४, ३५२, ३५१ (२), ३५१ (३) नुसार गुन्हे दाखल केले आहेत. सूरज गोसावी हे विश्रामबागमध्ये खासगी रुग्णालयाच्या जळीत कक्षात उपचार घेत आहेत.

बहुतांशजणांवर यापूर्वीही गुन्हेपोलिसांनी सांगितले की गोसावी आणि पाटील गटातील गुन्हे दाखल झालेले बहुतांश सराईत गुन्हेगार आहेत. त्यांच्याविरोधात विविध पोलिस ठाण्यांत विविध कलमांखाली गुन्हे दाखल आहेत. संदीप गोसावी, मुकेश गोसावी, प्रकाश गोसावी व सुखदेव गोसावी यांच्याविरोधात बेकायदा जमाव जमवून दंगल घडवणे, सार्वजनिक शांततेचा भंग, खुनाचा प्रयत्न, सशस्त्र हल्ला, फसवणूक आदी गुन्हे दाखल आहेत.

संभाजी पाटील याच्याविरोधात वाळूचोरी, अविनाश पाटील याच्याविरोधात तासगाव पोलिस ठाण्यात सदोष मनुष्यवध, संदीप निकमविरोधात सशस्त्र हल्ला, सार्वजनिक मालमत्तेचे विद्रुपीकरण, शस्त्र कायदा, विनायक शिंदेविरोधात अतिक्रमण, घुसखोरी, चोरी आदी गुन्हे दाखल आहेत.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस