शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: म्हैसाळच्या नवीन धरणाबाबत शेतकऱ्यांमध्ये भीती

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2025 18:43 IST

पावसाळ्यात नदीकाठची शेती उद्ध्वस्त होणार का ? : शेतकऱ्यांचा सवाल

सुशांत घोरपडेम्हैसाळ : म्हैसाळ येथे एक टीएमसी क्षमतेचे नवीन धरण बांधण्याचे काम प्रगतिपथावर सुरू आहे. मात्र, हे धरण झाल्यावर नदीकाठी शेतजमिनी असणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेती पाण्याखाली जाणार का ? असा प्रश्न नदीकाठी जमिनी असणाऱ्या शेतकऱ्यांना पडू लागला असून शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.कृष्णा नदीकाठी म्हैसाळ, कनवाड, ढवळी, कुटवाड या गावातील शेतकऱ्यांच्या जमिनी या नदीकाठी आहेत. पावसाळ्यात नदीकाठी असणाऱ्या सर्व शेतात पाणी जाऊन शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते. शेतीचा नदीकडेचा भाग नदीपात्रात कोसळून जातो. महापूर आल्यास महिनाभर शेतातील पाणी जात नाही. या परिस्थितीतून जात असताना आता नव्याने बांधत असलेल्या नवीन बराजची शेतकऱ्यांनी धास्ती घेतली आहे. त्यामुळे हा नवीन बंधारा झाल्यास नदीपात्रात पाणी किती साठणार? पावसाळ्यात किती फूट पाणी वाढणार ? असे अनेक प्रश्न नदीकाठच्या शेतकऱ्यांना सतावू लागले आहेत. सध्या कृष्णानदीवर कोल्हापूर पद्धतीचा जुना बंधारा आहे. या बंधाऱ्यामुळे अर्धा टीएमसी इतका पाणीसाठा करणे शक्य होत होते. या पाणीसाठ्यावर दोन ते तीन दिवस म्हैसाळ योजना सुरू राहत असते. आता नवीन बराज झाल्यास या धरणाची क्षमता एक टीएमसी इतकी होणार असून यामुळे म्हैसाळ योजना पूर्ण क्षमतेने चालणार आहे. या धरणामुळे ८१ हजार ६९७ हेक्टर क्षेत्रास या योजनेचा लाभ होणार आहे. म्हैसाळ नवीन बराजमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होणार नसल्याचे जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.शेतकऱ्यांसोबत संवाद हवा !म्हैसाळ, कनवाड, ढवळी, कुटवाड या गावातील अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी या नदीकाठी आहेत. या शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधण्याची गरज आहे.

आमच्या जमिनी नदीकाठी आहेत. नवीन बराज झाल्यास बॅक वॉटरमुळे शेती पाण्याखाली जाणार आहे. त्यामुळे शेतकरी उद्ध्वस्त होणार आहे. याबाबत लवकरच शेतकऱ्यांना सोबत घेऊन अर्ज करणार आहे. - एम. डी. पाटील, शेतकरी, म्हैसाळ

टॅग्स :Sangliसांगलीmiraj-acमिरजDamधरणFarmerशेतकरी