मनोरुग्ण मुलाच्या डोक्यात बापाने दगड घालून केला खून, वाटेगाव येथील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2026 20:03 IST2026-04-12T20:03:11+5:302026-04-12T20:03:46+5:30

सततच्या त्रासाला कंटाळून उचलले टोकाचे पाऊल.

Father kills mentally ill son by throwing stone at his head, incident in Wategaon | मनोरुग्ण मुलाच्या डोक्यात बापाने दगड घालून केला खून, वाटेगाव येथील घटना

मनोरुग्ण मुलाच्या डोक्यात बापाने दगड घालून केला खून, वाटेगाव येथील घटना

वाटेगाव (ता.वाळवा): सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वाटेगाव येथे अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. वडिलांनी स्वतःच्या मनोरुग्ण मुलाची दगडाने ठेचून हत्या केल्याची घटना रविवारी पहाटे उघडकीस आली.

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी पहाटे चार ते पाच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. मनोरुग्ण मुलाच्या सततच्या त्रासाला कंटाळून वडिलांनी त्याच्या डोक्यात दगड घालून त्याची हत्या केल्याचे समोर आले आहे.

आईची पोलिसांत फिर्याद

निखिल अरुण यादव (वय 31) असे मृत मुलाचे नाव आहे. या घटनेनंतर मृत मुलाची आई सुलभा अरुण यादव यांनी कासेगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. या प्रकरणी आरोपी वडील अरुण यशवंत यादव (वय 65) यांना अटक करण्यात आले आहे.

Web Title : वाटेगाँव में पिता ने मानसिक रूप से बीमार बेटे को पत्थर से मार डाला

Web Summary : वाटेगाँव में एक चौंकाने वाली घटना में, अरुण यादव नामक एक पिता ने अपने मानसिक रूप से बीमार बेटे निखिल की पत्थर से सिर कुचलकर हत्या कर दी। बेटे के लगातार कष्टों से तंग आकर पिता ने अपराध किया। माँ सुलभा यादव ने पुलिस में शिकायत दर्ज कराई, जिसके बाद पिता को गिरफ्तार कर लिया गया।

Web Title : Father Murders Mentally Ill Son with Stone in Wategaon

Web Summary : In a shocking incident in Wategaon, a father, Arun Yadav, murdered his mentally ill son, Nikhil, by crushing his head with a stone. Fed up with his son's constant suffering, the father committed the crime. The mother, Sulabha Yadav, filed a police complaint, leading to the father's arrest.