शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
4
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
5
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
6
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
7
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
8
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
9
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
10
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
11
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
13
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
14
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
15
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
16
आयोग नव्हे, मतदारच राजा !
17
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
18
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
19
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
20
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश

श्रावणाचे उपवास महागाईने झाले अधिक कडक, देवपूजेच्या साहित्यालाही जीएसटीचा झटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2022 12:33 IST

फक्त उपवासच महागला असे नाही, तर देवपूजादेखील खर्चिक बनली

सांगली : सणासुदीचे आणि उपवासाचे दिवस येतील, तशी उपवासाच्या पदार्थांची भाववाढ सुरू झाली आहे. साबुदाणा, शेंगदाणा, वरई यांच्या किमती सरासरी पाच ते दहा रुपयांनी वाढल्या आहेत.साबुदाणा किलोमागे ५ ते ८ रुपयांनी महागला आहे. किरकोळ विक्रीचे दर प्रतिकिलो ६८ रुपये झाले आहेत. वरई १०० ते ११० रुपये, तर शेंगदाणा १३२ रुपये किलोवर पोहोचला आहे. एक किलो राजगिरा १२० रुपयांना मिळत आहे. तळलेल्या पदार्थांमध्ये शाबू चिवडा २८०, बटाट्याचे वेफर्स ३३०, केळीचे वेफर्स ३२० रुपये किलोवर गेले आहेत.तुलनेने केळीचे दर स्थिर आहेत. वसईची केळी सरासरी ४० रुपये डझन, तर देशी केळी ८० रुपये डझन या दराने विकली जात आहेत. रताळ्यांचा भाव सरासरी ५० रुपये किलो आहे. एक वाघाटे पाच ते दहा रुपयांना विकले जात आहे.तेल स्वस्त झाले म्हणून काय झाले?सुदैवाने खाद्यतेलाचे भाव प्रतिकिलो १५ ते ३० रुपयांनी उतरले आहेत, पण तेल स्वस्त झाले म्हणून उपवासासाठी तळणीच्या पदार्थांवर जोर दिला, तर ऐन श्रावणात आजारपणाचा सामना करावा लागेल याचेही भान ठेवायला हवे.

अशी आहे दरवाढ

पदार्थ -   मे   - जुलैसाबुदाणा - ६० - ६८शेंगदाणे - ११० - १३२सफरचंद  - १०० - १५०मोसंबी  - ६० - ८०खजूर -  ७०  - ९०देवपूजादेखील खर्चिक बनली फक्त उपवासच महागला असे नाही, तर देवपूजादेखील खर्चिक बनली आहे. कापराची एक वडी सरासरी दीड ते दोन रुपयांवर पोहोचली आहे. ७० कापूरवड्यांचे पाकीट १२० रुपयांना खरेदी करावे लागत आहे.

उपवासाच्या पदार्थांच्या भाववाढीला डिझेलची दरवाढ, अतिवृष्टी आणि जीएसटी कारणीभूत ठरले आहेत. जागतिक स्तरावरील अस्थिर वातावरणामुळेही आयातीला फटका बसला आहे. साबुदाण्याचे भाव गतवर्षीच्या तुलनेने फार वाढलेले नाहीत. - अविनाश हळींगळे, किराणा व्यापारी.

टॅग्स :SangliसांगलीShravan Specialश्रावण स्पेशल