शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

Sangli Accident: इस्लामपुरात खासगी बसच्या धडकेत शेतकरी ठार, चालकावर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2025 12:57 IST

रस्ता बनला मृत्यूचा सापळा..!

इस्लामपूर : इस्लामपूर-सांगली रस्त्यावरील आंबेडकर नाका परिसरात भरधाव वेगात आलेल्या खासगी बसची पाठीमागून धडक बसून ७२ वर्षीय वृद्ध शेतकरी जागीच ठार झाल्याची घटना घडली. हा अपघात रविवारी सकाळी सातच्या सुमारास झाला. गेल्या पंधरा दिवसांत नव्याने झालेल्या सिमेंटच्या चौपदरी रस्त्यावरील अपघातातील हा दुसरा बळी ठरला.शंकर पांडुरंग वळसे (वय ७२, रा. उरुण) असे अपघातात ठार झालेल्या वृद्धाचे नाव आहे. याबाबत पुतण्या राहुल शिवाजी वळसे याने पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार खासगी बस चालक महावीर भूपाल कडाप्पा (वय ४७, रा. कडाप्पा मळा, यशवंत कॉलनीजवळ, कबनूर ता. हातकणंगले) याच्याविरुद्ध अपघात करून एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.उरुण परिसरातील शेतकरी शंकर वळसे हे आपल्या सांगली रस्त्यावरील शेतात सायकलवरून निघाले होते. आंबेडकर नाका परिसरात ते मुख्य महामार्गावरून शेताकडे जात असताना पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या खासगी बसची त्यांना धडक बसली. या धडकेत ते सिमेंटच्या रस्त्यावर पडून गंभीर जखमी झाले. अतिरक्तस्राव झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. सहायक पोलिस निरीक्षक किरण दीडवाघ अधिक तपास करीत आहेत.

रस्ता बनला मृत्यूचा सापळा..!पेठ-सांगली हा नव्याने घोषित झालेला राष्ट्रीय महामार्ग इस्लामपूर शहरातून जातो. या सिमेंटच्या रस्त्याचे चौपदरीकरण झाले आहे. मात्र, या रस्त्याच्या आजूबाजूला अनेक शेतकऱ्यांची शेती आहे. त्यामुळे सकाळपासून सायंकाळपर्यंत त्यांची ये-जा सुरू असते. ठिकठिकाणी दुभाजकामध्ये अंतर ठेवून शेतकरी-नागरिकांना येण्या-जाण्यासाठी मोकळी जागा ठेवली आहे.

रस्ता प्रशस्त झाल्याने वाहने सुद्धा सुसाट वेगात धावत असतात. या सुसाट वेगाने रविवारी दुसरा बळी घेतल्याने नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे. रस्ते विकास प्राधिकरणाने अपघात टाळण्यासाठी शहराच्या हद्दीतून जाणाऱ्या वाहनांचा वेग मर्यादित राहील, अशी उपाययोजना करावी, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :Sangliसांगलीislampur-acइस्लामपूरAccidentअपघातDeathमृत्यू