शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: मिरजेत बनावट नोटांचा कारखाना, ५० रूपयांच्या एक लाख ९० हजाराच्या नोटा जप्त; एकास अटक

By घनशाम नवाथे | Updated: June 8, 2024 15:51 IST

सांगली पोलिसांची कारवाई

सांगली : मिरजेत बनावट नोटांचा छोटा कारखाना काढून चक्क ५० रूपयांच्या बनावट नोटा चलनात आणणाऱ्या अहद महंमद अली शेख (वय ४४, रा. शनिवार पेठ, गणपती मंदिरजवळ, मिरज) याला सांगली शहर पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून एक लाख ९० हजार रूपयांच्या बनावट नोटा, छपाई मशिनरी, साहित्य असा ३ लाख ९० हजार रूपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सांगली शहर पोलिस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरणचे पथक दि. ७ रोजी पेट्रोलिंग करत असताना कर्मचारी संतोष गळवे, गौतम कांबळे यांना आकाशवाणी केंद्राजवळ एकजण बनावट नोटा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती खबऱ्यामार्फत मिळाली. पोलिस निरीक्षक संजय मोरे यांना हा प्रकार सांगितला. त्यांनी तत्काळ सापळा रचून कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. सहायक निरीक्षक सागर गोडे, उपनिरीक्षक महादेव मोरे यांची दोन पथके परिसरात पाहणी करण्यास गेली. तेव्हा आकाशवाणी केंद्राजवळ संशयित अहद शेख याला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता पॅन्टच्या खिशात ५० रूपये दराच्या भारतीय चलनाप्रमाणे हुबेहूब दिसणाऱ्या ७५ नोटा जप्त केल्या. पोलिसांनी नोटांची निरखून तपासणी केली असता सर्व नोटांचा कागद खऱ्या नोटांपेक्षा वेगळा दिसणारा आढळला. छपाईचा रंग आणि एकाच सिरीजच्या व एकाच नंबरच्या नोटा मिळून आल्या. त्याच्याविरूद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.शेख याची कसून चौकशी केल्यानंतर त्याने मिरजेत घराजवळ एका खोलीत बनावट नोटांची छपाई करत असल्याची माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी तेथे जाऊन छापा मारला. बनावट नोटा छपाईसाठीचे मशिन, कागद, वेगवेगळ्या रंगाची शाई, लॅमिनेटर मशीन, लाकडी स्क्रीन प्रिटिंग ट्रे, लाकडी पेपर अलाईमेंट पेटी, कटर मशिन, कटर, हेअर ड्राय मशिन, पट्टी, लॅमिनेशन व रंगीत कागद असे साहित्य जप्त केले. तसेच ५० रूपये दराच्या शंभर नोटांचे ३८ बंडल, अर्धवट छापलेली बंडले, मोबाईल असा एकुण ३ लाख ९० हजार रूपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.अहद शेख याला अटक केली असून त्याला पाच दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे. सहायक निरीक्षक गोडे, उपनिरीक्षक पोवार, अंमलदार संदीप पाटील, सचिन शिंदे, मच्छिंद्र बर्डे, विनायक शिंदे, मुलाणी, संतोष गळवे, गौतम कांबळे, संदीप कुंभार, योगेश सटाले, सुमित सूर्यवंशी, पृथ्वीराज कोळी, तपस्या खोत, कॅप्टन गुंडवाडे यांच्या पथकाने कारवाई केली.

आंतरराज्य कनेक्शन असल्याची शक्यतामिरजेत यापूर्वी बनावट नोटांची प्रकरणे उघडकीस आली आहे. मिरजेतून अहद शेख हा बनावट नोटा शेजारील कर्नाटक राज्यात वितरीत करत असल्याची शक्यता आहे. त्यामुळे आंतरराज्य कनेक्शन असल्याची शक्यता पोलिस निरीक्षक संजय मोरे यांनी व्यक्त केली.

१०, २० च्या नोटा छापण्याचा प्रयत्नअहद शेख याच्याकडे दहा आणि वीस रूपयाच्या बनावट नोटांचे नमुने मिळाले आहेत. तो दहा, वीस रूपयाच्या बनावट नोटा देखील छापणार असल्याची माहिती पुढे आली आहे.

एक वर्षापासून उद्योगअहद शेख हा एक वर्षापासून बनावट नोटा छापण्याचा उद्योग करत होता. परंतू त्याच्या कुटुंबियांना तसेच मिरजेतील शेजारील लोकांना याची अजिबात माहिती नसल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

७० रूपयाला शंभर रूपयेभारतीय चलनातील खऱ्या ७० रूपयाच्या बदल्यात तो बनावट ५० च्या दोन नोटा देत होता. ७० च्या बदल्यात बनावट शंभर रूपये असे त्याचे प्रमाण होते. एजंटामार्फत तो बनावट नोटा चलनात आणत असल्याची माहिती स्पष्ट झाली आहे.

वॉटरमार्कही बनवलापन्नास रूपयांच्या बनावट नोटेच्या डाव्या बाजूला महात्मा गांधींजींची प्रतिमा असलेला वॉटरमार्कही शेख याने बनवला होता. तसेच चांदीची तार नोटेत दिसावी यासाठी तो प्रयोग करत होता. बारावी पास अहद याच्याकडे छपाईच्या जुन्या आणि नव्या तंत्रज्ञानाची माहिती आहे.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस