शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

मॉडिफाय इंडिकेटरचे फॅड देतेय अपघाताला निमंत्रण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:48 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : दुचाकीच्या सायलंसरमध्ये बदल करून कर्णकर्कश आवाज करत फिरणाऱ्यांमुळे इतर वाहनधारकांना नाहक त्रास सहन ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : दुचाकीच्या सायलंसरमध्ये बदल करून कर्णकर्कश आवाज करत फिरणाऱ्यांमुळे इतर वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. आता यात भर पडत पोलिसांसारख्या रंगाच्या व बंद चालू होणाऱ्या इंडिकेटरमुळे सर्वसामान्यांना त्रास सहन करावा लागत आहे. रात्रीच्या वेळेत भरधाव वेगाने धोकादायक इंडिकेटर्स लावून जाणाऱ्या वाहनधारकांवर आता कारवाईची मागणी होत आहे.

मोटार वाहन कायद्यानुसार वाहनांमध्ये कोणताही बदल करावयाचा नसतो. तरीही गेल्या काही महिन्यांपासून सायलंसर बदलून वेगळ्याच आवाजात वाहन पळविणाऱ्यांची संख्या वाढत आहे. अगदी याच्या स्पर्धाही आयोजित करण्यात आल्या होत्या. अखेर पोलिसांनी एकाचवेळी ४०हून अधिक वाहनांवर कारवाई केल्यानंतर शहरात काही कालावधीसाठी हे प्रमाण कमी आले आहे. तरीही बुलेटच्या सायलंसरमध्ये बदल करण्याचे प्रकार सर्रास सुरूच आहेत.

वाहनाला पुढे दोन व मागे दोन असलेले इंडिकेटर्स हे वाहतूक सुरक्षेच्यादृ्ष्टीने खूप महत्त्वाचे असतात. वळण घेताना त्याचा वापर केल्याने अपघातांच्या घटना थांबत असतात. मात्र, आता इंडिकेटर्समध्येही बदल करण्याचे नवीनच फॅड वाहनधारकात आले आहे. इंडिकेटर्सचा उपयोग केवळ उजवीकडे, डावीकडे दिशा दाखविण्यासाठी अपेक्षित असताना, अनेक वाहनधारक चारही इंडिकेटर्स एकाचवेळी लागतील असा बदल करून घेत आहेत. त्यामुळे लांबून वाहन बघताना पोलीस गाडीचाच भास होतो. शिवाय अनेकांनी त्याचे रंगही हुबेहूब पोलिसांच्या दिव्यांप्रमाणे करून घेतले आहेत. त्यामुळे अनेकांचा गैरसमज होतो. याशिवाय या दिव्यांचा प्रकाश प्रखर असल्याने पाठीमागून जाणाऱ्यांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे.

चौकट

चायनामेड, मिरची इंडिकेटस त्रासदायक

दुचाकीचे इंडिकेटर बदलताना अनेकजण चायनामेडचा वापर करत आहेत. शिवाय मिरची इंडिकेटरमुळे आकार लहान असलातरी त्याच्या प्रकाशामुळे इतरांचे डोळे दिपून जात आहेत. रात्रीच्या वेळी रस्त्यावरील वर्दळ कायम असतानाच, या वाहनधारकांची धोकादायक रपेट अपघाताला निमंत्रण देणारी ठरत आहे.

कोट

सायलंसरपाठोपाठ इंडिकेटर्समध्ये बदल करण्यात येत असल्याचे प्रकार समोर येत आहेत. यात वाहनचालकांसह असे बदल करणाऱ्या मॅकेनिकवरही कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे कुणीही असे बदल करून नयेत.

प्रज्ञा देशमुख, सहा.पोलीस निरीक्षक, वाहतूक शाखा