शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

सामाजिक न्याय योजनांचा लाभ तळागाळापर्यंत पोहोचवा : सुरेश खाडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2019 4:52 PM

सांगली : जिल्हा वार्षिक अनुसूचित जाती उपयोजनेंतर्गत 81 कोटी 51 लाख इतक्या रक्कमेचा आराखडा सन 2019-20 साठी जिल्ह्याला मंजूर ...

ठळक मुद्देसामाजिक न्याय योजनांचा लाभ तळागाळापर्यंत पोहोचवा : सुरेश खाडेसांगलीत अनुसूचित जाती उपयोजना आढावा बैठक

सांगली : जिल्हा वार्षिक अनुसूचित जाती उपयोजनेंतर्गत 81 कोटी 51 लाख इतक्या रक्कमेचा आराखडा सन 2019-20 साठी जिल्ह्याला मंजूर असून 26 कोटी 98 लाखाचा निधी प्राप्त झाला आहे. तर नाविण्यपूर्ण योजनेसाठी 2 कोटी 44 लाख 53 हजार इतका निधी उपलब्ध झाला आहे. सामाजिक न्यायाच्या योजनांसाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध असून यंत्रणांनी संवेदनशिलपणे राहून विविध योजनांच्या माध्यमातून लाभार्थ्यांना लाभ मिळवून द्यावा. निकष पूर्ण करणाऱ्या कामांचे प्रस्ताव त्वरीत पूर्ण करावेत. निधी अखर्चित राहिल्यास अधिकाऱ्यांना जबाबदार धरण्यात येईल, असे प्रतिपादन सामाजिक न्याय मंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी केले.जिल्हा वार्षिक अनुसूचित जाती उपयोजना आढावा बैठक सामाजिक न्याय मंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. यामध्ये मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत, महानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस, समाज कल्याण सहाय्यक आयुक्त सचिन कवले यांच्यासह विविध यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.सामाजिक न्याय मंत्री डॉ. सुरेश खाडे म्हणाले, अधिकाऱ्यांनी निधींची मागणी करत असताना समाजाच्या गरजा लक्षात घेऊन प्रस्ताव द्यावेत. गतवर्षीच्या झालेल्या कामांची उपयोगिता प्रमाणपत्र तात्काळ द्यावीत, असे सांगून विहीत पध्दतीने निधी विहीत कालावधीत खर्च करून चांगल्या कामांच्या माध्यमातून योजना जनतेपर्यंत पोहोचवा असेही त्यांनी यावेळी सांगितले.यावेळी त्यांनी कामांना तांत्रिक मान्यता देणे, निविदा मागविणे व अनुषंगिक कामांची सर्व जबाबदारी कार्यान्वित यंत्रणांची असून नाविण्यपूर्ण योजनेतूनही चांगले उपक्रम राबविण्याच्या सूचना दिल्या. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजनेंतर्गत 5 कोटी रूपयांच्या मर्यादेत जागेच्या उताऱ्यासह परिपूर्ण प्रस्ताव सादर करण्याचे निर्देशही त्यांनी संबंधित यंत्रणांना दिले.

सन 2022 पर्यंत सर्वांसाठी घरे या उद्दिष्टाच्या पूर्तीसाठी घरकुल योजनांची माहिती तळागाळापर्यंत पोहोचवावी. प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंमलबजावणीमध्ये कोणतीही अडचण निर्माण होणार नाही याकडे कटाक्षाने लक्ष द्यावे, असे निर्देश सामाजिक न्याय मंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी दिले.यावेळी डॉ. खाडे यांनी पशुसंवर्धन, मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन योजना, कृषि विभागाकडील विविध योजना, विद्युत विकास आदि विषयांचा आढावा घेतला. तसेच शासकीय निवासी शाळा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन या ठिकाणी शुध्द पाणी प्रकल्प स्थापित करण्यासाठीचा प्रस्ताव लवकरच मान्यतेसाठी सादर करण्यात येत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी यंत्रणांनी नजिकच्या काळात होणाऱ्या विधानसभा निवडणूकीच्या आचारसंहितेच्या अनुषंगाने कामांचे प्रस्ताव तात्काळ सादर करावेत असे निर्देश दिले.

टॅग्स :ministerमंत्रीcollectorजिल्हाधिकारीSangliसांगली