शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा एक नवीन पायंडा काही मोजक्या पत्रकारांनी पाडलाय"; राज ठाकरे संतापले, नेमकं काय घडले?
2
"तुम्ही भारताचे पंतप्रधान असाल किंवा चीनचे राष्ट्राध्यक्ष, पण जर तुम्ही..."; नाटोच्या प्रमुखांची तीन देशांना थेट धमकी
3
मनसे नेते प्रकाश महाजनांना अमित ठाकरे, बाळा नांदगावकरांचा फोन; नाराजी दूर करण्याचा प्रयत्न
4
नशिबाचा खेळ! ३३ वर्षांपूर्वी मुलासाठी ढाबा बांधत होते, तिथेच मुलाचा मृत्यू झालेला, त्याच ढाब्यासमोर फौजा सिंग यांना कारने उडवले
5
Mumbai: सोसायटीच्या दहाव्या मजल्यावरून पडून अभियंत्याचा मृत्यू, मालाड पश्चिम येथील घटना
6
अपडेट झालं नाही तर बंद होईल मुलांचं आधार कार्ड; UIDAI नं नियमांमध्ये केला मोठा बदल
7
Vastu Tips: श्रीमंतांचं घर जणू आरसेमहल; कारण आरसे योग्य दिशेला लावण्याने वाढते संपत्ती!
8
अशोक मामांना भेटली छोटी रमा! "त्यांनी भेट झाल्या झाल्या...", तेजश्री वालावलकरची पोस्ट
9
'हो, मी पुतीन यांच्यावर खूपच नाराज आहे, पण..."; डोनाल्ड ट्रम्प यांची रोखठोक भूमिका, काय सांगितले?
10
बायकोने रचला हत्येचा कट, मित्र अन् बॉयफ्रेंडने दिली साथ! नवऱ्याच्या कार अपघातामागचं सत्य ऐकून बसेल धक्का
11
अ‍ॅथलीट फौजा सिंग हिट अँड रन प्रकरणातील आरोपी अमृतपाल सिंगला अटक; पोलिसांनी फॉर्च्युनर कार जप्त केली
12
सुचित्रा बांदेकरांचं टीव्हीवर पुनरागमन, हिंदी मालिकेत झळकणार; 'आई कुठे...' फेम मिलिंद गवळीही मुख्य भूमिकेत
13
लंडन-न्यू यॉर्क विसरा! 'हे' आहे जगातील सर्वात महागडं शहर, आपल्या मुंबईचंही यादीत नाव!
14
देशातील 'ही' सर्वात मोठी बँक पहिल्यांदाच देणार बोनस शेअर्स; डिविडंडही मिळणार, १९ जुलै महत्त्वाचा दिवस
15
निवडक १२० पदाधिकारी, १०९ मिनिटांचं प्रश्नोत्तराचे सत्र; मनसे शिबिरात राज ठाकरे काय बोलले?
16
एक स्कीम मुलीसाठी, दुसरी सर्वांसाठी; पाहा तुमच्या गरजेनुसार NPS वात्सल्य-सुकन्यापैकी कोणती आहे बेस्ट?
17
२० गुप्त तळघरे, दुबईच्या मौलानाकडून ट्रेनिंग, पुस्तकातून पसरवला द्वेष! छांगुर बाबाचा नेमका प्लान काय होता? 
18
Stock Market Today: ३६ अंकांनी घसरुन सेन्सेक्स उघडला; मेटल क्षेत्रात घसरण, IT मध्ये तेजी; HDFC-Infosys सह 'यात' तेजी
19
उत्तेजक व्हिडिओ अन् अश्लील भाषा वापरून कमवायचे दरमहिना ३५ हजार; पोलीस तपासात केले कबूल 
20
पोलीस ठाण्यात काम करता करता होमगार्डसोबत पळून गेली तीन मुलांची आई! पोलिसांत धाव घेत पती म्हणाला... 

अवकाळीने द्राक्ष, डाळिंबाचे नुकसान

By admin | Updated: January 5, 2015 00:34 IST

शेतकरी हवालदिल : जत पूर्वभागात रब्बीही वाया, उत्पादन घटले

गजानन पाटील - दरीबडची -अवकाळी पावसामुळे जत पूर्व भागातील द्राक्षे, डाळिंब व रब्बी हंगामातील पिकांचे नुकसान झाले आहे. भिवर्गी, संख, अंकलगी, करजगी, सिद्धनाथ या भागातील पिकलेल्या द्राक्ष फळबागांचे नुकसान झाले आहे. घडामध्ये पाणी साचून रोटिंग, मणी गळ झाली आहे, तर रब्बी हंगामातील ज्वारी, हरभरा या आगाप पेरणी झालेल्या पिकांवर गंभीर परिणाम झाला आहे. हुरड्यात आलेल्या ज्वारी पिकाची कणसे काळी पडू लागली आहेत. हरभऱ्याचा फुलोरा गळून पडू लागला आहे. दर हेक्टरी उत्पादनात घट होणार आहे. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त बनला आहे.रब्बी हंगाम शेतीचा मुख्य हंगाम आहे. यावर्षी पावसाने वेळेवर हजेरी लावल्याने रब्बी हंगामातील पिकांची वेळेवर उगवण झाली. शिवारभर पिके बहरली आहेत. काही ठिकाणी आगाप पेरणी झाली आहे. तेथील ज्वारी पीक हुरड्यात आहे. कमी दाबाच्या पट्ट्यामुळे हवामानात बदल होऊन गुरुवारपासून अवकाळीचा पाऊस पडू लागला आहे. अवकाळीचा फटका ज्वारी, हरभरा पिकांना बसला आहे.ज्वारी काळी पडणे, दाणे भरीव न भरणे व कणसावरील फुलोरा गळून जाणे आदी परिणाम होऊ लागले आहेत. तसेच हरभऱ्याचा फुलोरा झडला जाणार असल्याने घाटे कमी सुटणार आहेत. अवकाळी पावसामुळे जमीन ओलसर होणार आहे. वाढत्या थंडीमुळे ज्वारीवर चिकटा, हरभऱ्यावर घाटी अळीचा प्रादुर्भाव होणार आहे. त्यामुळे पिके चांगली येऊनसुद्धा दर हेक्टरी उत्पादनात घट होणार आहे.पूर्व भागातील भिवर्गी, संख, करजगी, अंकलगी, सिद्धनाथ परिसरातील २०० एकर द्राक्ष बागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या बागा परिपक्व आहेत. त्या बागांवर रोटिंग, मणी गळणे आदी परिणाम होत आहेत. सध्या बाजारात दर चांगला आहे. पावसामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाणार आहे. वाढता मशागतीचा खर्च, महागडी औषधे, रासायनिक खतावर लाखो रुपये खर्च झालेले आहेत. तसेच डाळिंबाला पाणी जादा झाल्याने फळे फुटू लागली आहेत. वाढती थंडी, अवकाळी पावसामुळे द्राक्षातील गोडी कमी झाली आहे.