शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
5
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
6
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
7
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
8
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
9
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
10
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
11
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
12
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
13
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
14
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
15
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
16
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
17
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
18
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
19
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
20
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

मंत्रिमंडळाचा विस्तार झाला, शेतकऱ्यांना भरपाई कधी?; खासदार, आमदार शेतकऱ्यांचे प्रश्न मांडणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2024 16:08 IST

जिल्हा प्रशासनाकडून साडेअकरा कोटींची मागणी : अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान

सांगली : जिल्ह्यात ऑगस्ट ते ऑक्टोबर महिन्यांत झालेल्या अतिवृष्टीमुळे १३ हजार ३७३ शेतकऱ्यांचे सहा हजार १५८.०७ हेक्टरवरील बागायती आणि फळ अशी पिके वाया गेली. ऊस, द्राक्ष, डाळिंब, केळी, सोयाबीन, मका, ज्वारी, हळद, भाजीपाल्यासह ११ कोटी ५८ लाख सात हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे पंचनाम्यात स्पष्ट झाले होते. या भरपाईची शासनाकडे मागणी करून दोन महिने झाले तरीही भरपाईची रक्कम मिळाली नाही. निवडणुका झाल्या, मंत्रिमंडळाचा विस्तार झाला, आता तरी भरपाई द्या, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.एप्रिल ते जुलै महिन्यांत झालेल्या अतिवृष्टी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना १२ कोटी ३९ लाख नऊ हजार ३५ रुपयांची भरपाई शासनाकडून मिळाली होती. या भरपाईचे वाटप झाले आहे; पण ऑगस्ट ते ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे सहा हजार १५८.०७ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले आहे. मिरज, पलूस, वाळवा, शिराळा, कडेगाव, खानापूर, तासगाव तालुक्यांचा समावेश आहे. अतिवृष्टी आणि पुराच्या पाण्यामुळे ऊस, सोयाबीन, भात, भुईमूग, पपई, केळी, द्राक्षांसह भाजीपाला वाया गेला होता.या नुकसानीचे पंचनामे महसूल आणि कृषी विभागातर्फे करण्यात आला होता; पण विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्यामुळे नुकसानभरपाईची मदत मिळण्यात अडचणी निर्माण झाली होती; पण पंचनामे झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाने अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांच्या भरपाईसाठी ११ कोटी ५४ लाख रुपयांची शासनाकडे मागणी केली आहे. विधानसभा निवडणुका झाल्या आणि आता तर मंत्रिमंडळाचा विस्तारही झाला आहे. तरीही शेतकऱ्यांना नुकसानभरपाईची मदत मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांमधून तीव्र शब्दांत नाराजी आहे.जिल्ह्यातील १३ हजार ३७३ शेतकरी शासनाच्या नुकसानभरपाईची प्रतीक्षा करत आहेत; पण या शेतकऱ्यांचा आवाज आजही शासनाच्या कानावर पोहोचत नसल्यामुळे त्यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे.

शेतकऱ्यांना अशी मिळणार भरपाईजिल्ह्यातील शेतकऱ्यांना दि. १ जानेवारी २०२४ च्या शासन आदेशानुसार जिरायत पिकांसाठी हेक्टरी १३ हजार ६०० रुपये, बागायत पिकांसाठी हेक्टरी २७ हजार आणि बहुवार्षिक पिकांसाठी हेक्टरी ३६ हजार रुपयांची मदत वाटप करण्यात येणार आहे, अधिकाऱ्यांनी सांगितले.

खासदार, आमदार शेतकऱ्यांचे प्रश्न मांडणार?अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाल्यामुळे खरीप हंगाम शेतकऱ्यांच्या पदरात पडला नाही. यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आहेत. या शेतकऱ्यांच्या व्यथा अधिवेशनामध्ये मांडण्यासाठी जिल्ह्यातील खासदार, आमदारांना वेळ मिळणार का? असा सवालही शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.

टॅग्स :SangliसांगलीFarmerशेतकरीfundsनिधी