शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Sangli Politics: खासदार विशाल पाटील यांची भाजपशी जवळीक, मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले..

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2025 20:35 IST

'जयश्रीताई पाटील यांचा प्रवेश जबरदस्तीने करायला त्या लहान मूल नाहीत'

सांगली : वसंतदादा घराणे फोडल्याचा आरोप चुकीचा आहे. दादांच्या नातसून व जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा जयश्रीताई पाटील यांनी भविष्याचा व कार्यकर्त्यांचा विचार करून भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांचा प्रवेश जबरदस्तीने करायला त्या लहान मूल नाहीत, असे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी स्पष्ट केले. खासदार विशाल पाटील यांची भाजपशी जवळीक वाढत असली तरी सध्या ते भाजपला हवेत अशी स्थिती नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.श्रीमती पाटील यांच्या भाजप प्रवेशानंतर खासदार विशाल पाटील यांनी दादा घराणे फोडल्याचा आरोप केला होता. त्याला प्रत्युत्तर देत पालकमंत्री पाटील म्हणाले की, जयश्री पाटील या लहान मूल नाहीत. त्यांना भाजपमध्ये जबरदस्ती आणले नाही. भवितव्याचा व कार्यकर्त्यांचा विचार करून त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. ही प्रक्रिया अनेक दिवस सुरू होती, असे त्यांनी स्पष्ट केले.खासदार विशाल पाटील यांची भाजपशी सलगी वाढल्याबद्दल विचारता पालकमंत्री पाटील म्हणाले, उपराष्ट्रपतिपदाची निवडणूक झाली आहे. त्यामुळे ते आता भाजपचे सहयोगी सदस्य होतील, अशी कोणतीही गोष्ट भविष्यात नाही. भाजपला हे खासदार हवेतच, असा प्रसंगदेखील भविष्यात येणार नाही. महापालिकेच्या कारभाराबाबत ते म्हणाले की, आयुक्तांचे चांगले काम आहे. काहींना विस्कळीत काम करण्याची सवय लागली होती. त्यांना आयुक्तांच्या कामाचा त्रास होऊ लागला आहे; पण नागरिकांना शहराच्या विकासाची शिस्त आवडते.