शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज्यातून १ कोटी सह्या घेणार, काँग्रेसचा महिला विरोधी चेहरा उघड करू”: CM देवेंद्र फडणवीस
2
अमेरिकेचे सैन्य, इराणचे महाकाय जहाज; होर्मुझ सामुद्रधुनी सहा तास संघर्ष आणि घेतले ताब्यात; व्हिडीओ पहा
3
“२ लाख ७० हजाराचा रेकॉर्ड मोडायचा, बारामती निवडणूक बिनविरोध व्हायला हवी होती पण…”: पार्थ पवार
4
इंधन-गॅसचा पुरवठा लवकरच सुरळीत होणार? शनिवारी २० जहाजांनी पार केले होर्मुझ...
5
कियाने पुन्हा लाँच केली न खपणारी कार, गेल्या महिन्यात ५९ पण विकल्या नव्हत्या, ५०० चा आकडा गाठतानाही...
6
सूट-बूट घालून आला, पाहुण्यांमध्ये मिसळला अन् ५ लाख घेऊन पळाला; Video पाहून बसेल धक्का
7
जम्मू-काश्मीरच्या उधमपूरमध्ये बसचा भीषण अपघात; १५ जणांचा मृत्यू, अनेक प्रवासी गंभीर जखमी
8
Latest Marathi News LIVE Updates: खासदार सुप्रिया सुळे यांचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र, मागण्या काय?
9
Ashok Kharat : "...तर नागदेवता तुझ्या मुलास दंश करेल"; भोंदू अशोक खरातने महिलेला दाखवलेली भीती
10
‘विकसित भारत संकल्पात पालघरचा सहभाग हवाच’ राज्यपालांच्या हस्ते डहाणूत आरोग्यसेवांचे लोकार्पण
11
लेकीला कडेवर घेऊन पाऊण तास उभा, १०० रिक्षांना हात दाखवला तरीही...; डोंबिवलीतील व्हिडीओ व्हायरल
12
हैवान! पित्याने आपल्या ७ मुलांना झोपेतच संपवलं, चार मुलं स्वत:च्या पत्नीपासून तर तीन मुलं...
13
“तुम्ही ७५ काय, १७५ वर्षे आरक्षण घ्या, आम्हाला गरज नाही”; बृजभूषण शरण सिंह यांचा रोख कुणाकडे?
14
मध्यस्थीच्या नावाखाली ‘वसुली’ करण्याचा पाकचा मोठा डाव; पूर्वीही दोनदा असेच खिसे भरून घेतलेत!
15
Chanakya Niti: आचार्य चाणक्य म्हणतात, 'या' मानसिकतेमुळे लक्ष्मी पाठ फिरवते! तुम्ही तर ही चूक करत नाही ना?
16
Mamata Banerjee : "नाव, पत्ता सगळं माहित आहे, हिशोब तर होणारच!"; ममता बॅनर्जींची अधिकाऱ्यांना थेट धमकी
17
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खानने ११ एप्रिलला घेतले मुंब्र्यात उपचार; जामीन अर्जावर आज सुनावणी
18
369 हा एक आकडा नाही, ब्रह्मांडाची ताकद आहे; मनात आणाल, पूर्ण होईल, २१ दिवसांत संकेत मिळतील!
19
MSRTC: एसटी आगार, परिसर स्वच्छतेचा करोडोंचा खर्च प्रवाशांच्या माथी
20
Avinash Bhosale: बिल्डर अविनाश भोसले यांना दिलासा; मालमत्तांवरील कारवाई रद्द
Daily Top 2Weekly Top 5

मोबाईलच्या जमान्यातही लँडलाईन, काॅईनबाॅक्सची ट्रिंग ट्रिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:26 IST

डमी ११३१ लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : ‘मेरे पिया गये रंगून, किया है वहाँ से टेलिफून’, ‘टेलिफोन धून में ...

डमी ११३१

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : ‘मेरे पिया गये रंगून, किया है वहाँ से टेलिफून’, ‘टेलिफोन धून में हसने वाली’ अशा अनेक गाण्यांनी लँडलाईनवरील प्रेमाच्या कहाण्या चित्रपटांमधून मांडल्या. काळ बदलला आणि आता मोबाईलवरच्या प्रेमाची गाणी वाजू लागली. मोबाईलचा जमाना आला असला तरी आजही लँडलाईनची ट्रिंग ट्रिंग अनेक दुकाने, ऑफिसेस व अनेकांच्या घरातही ऐकायला मिळते अन् या दोन जमान्यांमधील फरकाची दोरही स्पष्टपणे दिसते.

एकेकाळी लँडलाईन, काॅईनबॉक्सची संख्या लाखोंच्या घरात होती. एसटीडी बुथ पावलोपावली दिसत होते. मोबाईल क्रांतीने जुन्या संपर्क माध्यमांवर अतिक्रमण केले आणि अनेकांच्या हातातून ही साधने जाऊन स्मार्टफोन आले. घरोघरी चार-चार मोबाईल आले, तरीही जुन्या पिढीतले काही लोक, व्यापारी, व्यावसायिक, बँका, कार्यालये यांच्या माध्यमातून लँडलाईनचे अस्तित्व काही प्रमाणात टिकून आहे.

चौकट

जिल्ह्यात केवळ १७ हजार लँडलाईन

जिल्ह्यातील लँडलाईनची संख्या सध्या १७ हजार १२१ इतकी आहे. लँडलाईनचा वापर करणाऱ्यांमध्ये विविध कंपन्या, शासकीय कार्यालये, बँका व अन्य व्यावसायिकांचे प्रमाण अधिक आहे.

चौकट

जिल्ह्यात २१० काॅईनबॉक्स

रुपया टाकून काॅईनबॉक्सवर बोलण्याचा जमानाही आता गेला. तरीही जिल्ह्यात अद्याप २१० काॅईनबॉक्स आहेत. काही वर्षांपूर्वी जिल्ह्यात पावलोपावली काॅईनबॉक्स दिसत होते. आता काॅईनबॉक्स शोधावे लागत आहेत.

चौकट

रेल्वे स्थानक, बसस्थानके, ग्रामीण भागातील काही दुकाने याठिकाणी हे काॅईनबॉक्स दिसून येतात. मोबाईल अचानक हरवला किंवा विसरलात तर काॅईनबॉक्सद्वारे संपर्क साधता येतो, मात्र काॅईनबॉक्स जवळ उपलब्ध असेलच असे नाही.

चौकट

म्हणून लँडलाईन आवश्यक

कोट

दुकानाची ओळख लँडलाईनशी जोडली गेलेली आहे. मोबाईलचा उपयोग हा अधिक असला तरी सुरक्षेच्या दृष्टीने लँडलाईन केव्हाही चांगला. इंटरनेटसाठीही हेच कनेक्शन बेस्ट आहे.

- महेश पाटील, लँडलाईन वापरकर्ते

कोट

वाडवडिलांची आठवण म्हणून सध्या लँडलाईन ठेवलेला आहे. आमच्या घरातील नवी पिढी लँडलाईनला हातही लावत नाही.

- मुजीर जांभळीकर, लँडलाईन वापरकर्ते