शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
2
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
3
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
4
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
5
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
6
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
7
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
8
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
9
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
10
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
11
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
12
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
13
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
14
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
15
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
16
परतूरचा 'विकासपुरूष' हरपला! माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
17
Top Marathi News LIVE Updates: महाराष्ट्र दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे मुख्यमंत्री फडणवीसांना खास पत्र
18
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
19
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
20
प्रेयसीने नाकारलं, टी-शर्टवर तिचा फोटो अन् टॅटू काढलेला तरुण थेट विजेच्या खांबावर चढला अन्...
Daily Top 2Weekly Top 5

स्वतंत्र पेठ तालुक्याची स्थापना करा : पाटील

By admin | Updated: November 14, 2014 23:22 IST

वाळवा पं. स. सभा : सभापतींचा नकार

इस्लामपूर : वाळवा तालुक्याचा समतोल विकास साधण्यासाठी शिराळा विधानसभा मतदारसंघात समावेश असलेल्या आणि विकासापासून दुर्लक्षित राहिलेल्या ४८ गावांचा स्वतंत्र पेठ तालुका करा, अशी खळबळजनक मागणी पं. स. सदस्य प्रकाश पाटील यांनी केली. मात्र सभापती रवींद्र बर्डे यांनी सभागृह या मागणीशी सहमत नाही असे म्हणून नकार दर्शवला.पंचायत समिती सभागृहात आज (शुक्रवारी) सभापती बर्डे यांच्या अध्यक्षतेखाली व उपसभापती सौ. भाग्यश्री शिंदे, गटविकास अधिकारी विजयसिंह जाधव यांच्या उपस्थितीत सभा झाली. पेठच्या प्रकाश पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या चर्चेवेळी तालुक्यातील रस्ते, त्यांची कामे, अधिकाऱ्यांवर पडणारा ताण असे मुद्दे मांडत, त्या ४८ गावांचा विकास रखडला आहे, चार जिल्ह्यांचे मध्यवर्ती केंद्र आहे. पूर्वी तेथे सर्व व्यवस्था उपलब्ध होत्या. कडेगाव, पलूसचा तालुका होतो, तर मग तसाच या ४८ गावांचाही पेठ तालुका करा, अशी जोरदार मागणी करत तसे निवेदन सभापती बर्डे यांच्याकडे सुपूर्द केले. त्यावर बर्डे यांनी सभागृह या मागणीशी सहमत नाही असे सांगत पाटील यांच्या विषयाला नकार दर्शवला.आरोग्य विभागावरील चर्चेवेळी शहरात डेंग्यूची साथ नसल्याचा निर्वाळा डॉ. श्रीकांत भोई यांनी दिला. त्यावेळी सुभाष पाटील (नेर्ले) यांनी, खासगी रुग्णालयात रुग्ण जातात याकडे लक्ष वेधले. मात्र डॉ. भोई यांनी त्याला नकार दिला. पं. स. आरोग्य विभागाच्या डॉ. अशोक सुतार यांनी मात्र असे रुग्ण आहेत हे मान्य करुन त्याबाबत करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.पंचायत समितीचे बांधकाम अभियंता आर. पी. चव्हाण यांनी, गरजेनुसार मंजूर असलेली तीन कोटींची ७५ विकासकामे शासनाची स्थगिती असल्याने सुरु करता येत नाहीत, अशी माहिती सभागृहाला दिली. सभेतील चर्चेत प्रीती सूर्यगंध, प्राजक्ता देशमुख, भारती कदम यांनीही भाग घेतला. (वार्ताहर)