शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

Sangli-Local Body Election: कवठेमहांकाळमध्ये समीकरणे बदलणार, घोरपडे गट महायुतीत जाण्याची चिन्हे

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2025 19:22 IST

राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

कवठेमहांकाळ : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांची चाहूल लागताच कवठेमहांकाळ तालुक्यातील राजकीय वातावरण तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)ने तालुक्यात नवी राजकीय दिशा देणाऱ्या हालचाली सुरू केल्या असून, माजी मंत्री अजितराव घोरपडे आणि युवानेते राजवर्धन घोरपडे यांच्या नेतृत्वाखाली दूध संघाच्या कार्यालयात महत्त्वपूर्ण रणनीती बैठक पार पडली. घोरपडे महायुतीसोबत लढणार की स्वतंत्र, हा प्रश्न काही दिवसांपासून चर्चेत होता. अखेर या बैठकीत ‘आगामी निवडणूक आम्ही महायुतीसोबत-विशेषतः भाजप आणि इतर मित्रपक्षांना घेऊनच लढणार,’ असा ठाम संदेश अजितराव घोरपडे यांनी देत राजकीय घडामोडींना नवी कलाटणी देणारा ठरणार आहे.बैठकीत तालुक्यातील चार जिल्हा परिषद गट आणि आठ पंचायत समिती गणांचे गावनिहाय सखोल विश्लेषण करण्यात आले. इच्छुक उमेदवारांची स्वतंत्र मुलाखत घेण्यात आली असून, काही गटांत अपेक्षेपेक्षा अधिक इच्छुक आल्याने स्पर्धा चुरशीची होणार आहे. बूथरचना, सोशल मीडिया रणनीती, ग्रामसभा, तरुण व महिला मतदारांपर्यंत पोहोच, तसेच राज्य सरकारच्या विकासकामांची प्रभावी मांडणी अशा विषयांवर विस्तृत चर्चा झाली.

राजकीय वर्तुळात चर्चांना उधाणराजकीय सूत्रांच्या मते, ही फक्त इच्छुकांची झडती नसून संपूर्ण संघटनात्मक पुनर्रचना असल्याचे संकेत मिळत आहेत. घोरपडे यांच्या भूमिकेमुळे महायुतीचा संभाव्य संयुक्त मोर्चा उभा राहण्याची शक्यता वाढली असून, तालुक्याच्या निवडणूक समीकरणात मोठे बदल होऊ शकतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Sangli: Kavthemahankal Election Equations to Change; Ghorpade Group Likely to Join Alliance

Web Summary : Kavthemahankal's political scene heats up as Ghorpade faction signals joining the Mahayuti alliance for upcoming local body elections. This decision, announced after a strategy meeting, could significantly alter the election dynamics, with discussions focusing on booth management and voter outreach.