उद्योजकांनी इंडस्ट्रीयल पार्क उभारावे - राजेंद्र पाटील यड्रावकर
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2025 17:34 IST2025-04-07T17:34:17+5:302025-04-07T17:34:59+5:30
सांगली : जैन समाज हा ३५ टक्के टॅक्स भरणारा समाज आहे. समाजातील उद्योजक वेगवेगळ्या क्षेत्रात अग्रेसर आहेत. नव उद्योजकांना ...

उद्योजकांनी इंडस्ट्रीयल पार्क उभारावे - राजेंद्र पाटील यड्रावकर
सांगली : जैन समाज हा ३५ टक्के टॅक्स भरणारा समाज आहे. समाजातील उद्योजक वेगवेगळ्या क्षेत्रात अग्रेसर आहेत. नव उद्योजकांना उभारी देण्यासाठी त्यांना इन्फ्रास्ट्रक्चर उभा करून देण्याची आवश्यकता आहे. यासाठी जैन समाजातील सर्व उद्योजकांनी एकत्र येऊन इंडस्ट्रीयल पार्कची उभारणी करावी, असे आवाहन आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी केले.
दक्षिण भारत जैन सभेच्यावतीने दिगंबर जैन उद्योजक, व्यापारी व सेवा संस्था यांचा मेळावा रविवार, दि. ६ रोजी धामणी येथील ऐश्वर्या मल्टीपर्पज हॉल येथे पार पडला. यामध्ये नव उद्योजक व बेरोजगारांसाठी उपयोगी ठरणाऱ्या जैन नेक्स्ट ॲपचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते पार पडले. यावेळी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, आमदार राहुल आवाडे, उद्योजक अभिनंदन पाटील, अतुलभाई शहा-सराफ, किरण पाटील, रविंद्र माणगावे, शीतल दोशी, अण्णासाहेब चकोते व भालचंद्र पाटील उपस्थित होते.
राजेंद्र पाटील यड्रावकर म्हणाले, उद्योग व व्यापार क्षेत्रात भरारी घेण्याची धडपड करणाऱ्या तरुणांना बळ देण्याची, त्यांच्यासाठी आवश्यक साधने उपलब्ध करुन देण्याची भूमिका जैन समाज पार पाडत आहे. आपली मुले नोकरीच्या मागे न लागता ती उद्योग, व्यापारात आली पाहिजे. यावेळी जैन समाजातील उद्योजकांनी एकत्र येऊ इंडस्ट्रीयल पार्क उभा करावे, असेही आवाहन त्यांनी केले.
भालचंद्र पाटील म्हणाले, जैन सभा आरोग्य, संस्कार, शेती, उद्योग आणि शिक्षण या पंचसूत्रीवर आधारित काम करत आहे. यावेळी रावसाहेब पाटील, भाऊसाहेब नाईक, डॉ. अजित पाटील, उद्योजक शीतल थोटे, प्रा. एन. डी. पाटील आदींसह उद्योजक, महिला उपस्थित होत्या.
जैन नेक्स्ट बिझनेस ॲप
जैन नेक्स्ट बिझनेस ॲपद्वारे समाजातील नवउद्योजकांना उभारणी दिली जाणार आहे. तर बेरोजगारांना नोकरीची संधी उपलब्ध करुन दिली जाणार आहे. एखाद्याला उद्योग उभारयचा असेल तर इतर उद्योजक त्याला मार्गदर्शन करतील, तर बेरोजगार तरुणाला एखादा उद्योजक त्या युवकांच्या कौशल्याच्या आधारे त्याला नोकरी उपलब्ध करून देईल.