सांगली : तब्बल पावणेचार वर्षांच्या विलंबानंतर जिल्हा परिषदेचे रणांगण तापणार आहे. पावणेचार वर्षांपासून निवडणुकीच्या प्रतीक्षेतील इच्छुकांसाठी निवडणूक आयोगाने मंगळवारी गुड न्यूज दिली. पण, एकूणच प्रक्रियेसाठी अवघा तीन आठवड्यांचा कालावधी दिल्याने मोठी धावपळ होणार आहे.काही महिन्यांपूर्वी प्रभाग रचना, आरक्षण आदी प्रक्रिया पार पडल्याने निवडणुकांची चाहूल लागली होती. त्यात पुन्हा कायदेशीर आव्हाने निर्माण झाल्याने त्या लांबण्याची भीती होती. पण, मंगळवारी घोषणा झाल्याने इच्छुकांचा जीव भांड्यात पडला आहे. मावळत्या जिल्हा परिषदेमध्ये भाजप युतीची सत्ता होती. यावेळेस भाजप महायुती विरोधात महाविकास आघाडी अशी निवडणूक रंगण्याची चिन्हे आहेत.गेल्यावेळी शेवटची अडीच वर्षे अध्यक्षपद महिलेकडे होते. आगामी काळातही अडीच वर्षांसाठी अध्यक्षपद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव आहे. १४ जुलैरोजी जाहीर झालेल्या प्रारूप प्रभाग रचनेनुसार ६१ गट आणि १२२ गण निश्चित करण्यात आले आहेत.अशी आहे आरक्षण स्थितीपंचायत समित्यांच्या सभापतीपदाचे आरक्षण असे : सर्वसाधारण महिला - ३, खुले - ३, नागरिकांचा मागास प्रवर्ग - ३ (१ महिला व २ पुरुष), अनुसूचित महिला १.असे आहेत तालुकानिहाय गट व गणतालुका - गट - गणमिरज - ११ २२तासगाव - ६ १२कवठेमहांकाळ - ४ ८जत - ९ १८पलूस - ४ ८कडेगाव - ४ ८खानापूर,विटा ४ ८आटपाडी - ४ ८वाळवा - ११ २२शिराळा - ४ १२एकूण - ६१ १२२
असे आहे पक्षीय बलाबल
जिल्हा परिषदपक्षीय संख्याबळभाजप - २४राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) १४काँग्रेस १०शिंदेसेना ३स्वाभिमानी शेतकरी संघटना १स्वाभिमानी विकास आघाडी २रयत विकास आघाडी ४अपक्ष - २
पंचायत समितीभाजप ५राष्ट्रवादी (शरद पवार) ३शिंदेसेना १काँग्रेस - ००राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडी १
Web Summary : After a long delay, Sangli Zilla Parishad elections are set. 61 district council groups and 122 panchayat samiti constituencies will see a battle between BJP alliances and Maha Vikas Aghadi. Reservations are announced, and party strengths are detailed.
Web Summary : लंबे इंतजार के बाद, सांगली जिला परिषद चुनाव होने वाले हैं। 61 जिला परिषद समूह और 122 पंचायत समिति निर्वाचन क्षेत्रों में भाजपा गठबंधन और महा विकास अघाड़ी के बीच मुकाबला होगा। आरक्षण की घोषणा, दलीय स्थिति का विवरण दिया गया।