लोकांचा कल निवडणुकीने सिद्ध केला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 05:08 IST2020-12-05T05:08:21+5:302020-12-05T05:08:21+5:30
विधानपरिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठे यश मिळाले. यातून मतदारांचा विश्वास कोणावर आहे, हे सिद्ध झाले. त्यामुळे भविष्यातील निवडणुकाही आम्हाला ...

लोकांचा कल निवडणुकीने सिद्ध केला
विधानपरिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठे यश मिळाले. यातून मतदारांचा विश्वास कोणावर आहे, हे सिद्ध झाले. त्यामुळे भविष्यातील निवडणुकाही आम्हाला अशाच एकीच्या जाेरावर जिंकायच्या आहेत. या तिन्ही पक्षांतील कार्यकर्त्यांचा उत्साह वाढविणारी व प्रेरणा देणारी ही निवडणूक आहे.
- आ. मोहनराव कदम, जिल्हाध्यक्ष, काँग्रेस
कोट
अतिआत्मविश्वास व मतदारांना गृहीत धरून चालणाऱ्या तसेच शेतकरी, कामगारांसह सर्व घटकांवर अन्याय करणाऱ्या भाजपला हा निकाल म्हणजे एक चपराक आहे. मतदारांनी राज्यातील महाविकास आघाडीच्या कामावर, त्यांच्या कार्यपद्धतीवर यातून विश्वास व्यक्त केला आहे.
- संजय विभुते, जिल्हाप्रमुख, शिवसेना
कोट
राजकारणात यश-अपयश या गोष्टी असतातच. तरीही अपयश का आले, याची कारणमीमांसा करून सुधारणा करीत आम्ही नव्या जाेमाने कार्यरत राहू. लोकहिताचे राजकारण व खिलाडूवृत्ती या गोष्टी यापुढील काळातही जपल्या जातील.
- आ. सुधीर गाडगीळ
कोट
जनतेचा कौल आम्ही प्रामाणिकपणे मान्य करतो. निवडून आलेले उमेदवार लोकांचे, संबंधित घटकांचे प्रश्न सोडवतील, अशी आशा व्यक्त करतो. निवडणुकीत निश्चितपणे चढ-उतार असतात. भाजपचे राजकारण हे देश, समाजहित आणि विकास या त्रिसूत्रीवर अवलंबून आहे. तरीही आलेल्या अपयशाची कारणे आम्ही शोधू
- मकरंद देशपांडे, संघटक, पश्चिम महाराष्ट्र, भाजप