शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
2
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
3
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
4
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
5
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
6
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
7
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
8
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
9
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
10
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
11
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
12
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
13
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
14
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
15
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
16
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
17
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
18
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
19
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
20
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !

सांगली जिल्हा बँकेच्या रडारवर आठ बडे थकबाकीदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2019 6:50 PM

नफ्याची शंभरी ओलांडल्यानंतर आता जिल्हा बँकेने एनपीए कमी करण्यासाठी आर्थिक नियोजन केले असून बडे थकबाकीदार बँकेच्या रडारवर आले आहेत. बड्या थकबाकीदारांकडे असलेले १६0 कोटी रुपये वसूल करण्यासाठी बँकेने मास्टर प्लॅन तयार केला आहे. त्यासाठी कारवाईच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत.

ठळक मुद्देसांगली जिल्हा बँकेच्या रडारवर आठ बडे थकबाकीदारमास्टर प्लॅन तयार, कारवाईच्या हालचाली गतिमान

सांगली : नफ्याची शंभरी ओलांडल्यानंतर आता जिल्हा बँकेने एनपीए कमी करण्यासाठी आर्थिक नियोजन केले असून बडे थकबाकीदार बँकेच्या रडारवर आले आहेत. बड्या थकबाकीदारांकडे असलेले १६0 कोटी रुपये वसूल करण्यासाठी बँकेने मास्टर प्लॅन तयार केला आहे. त्यासाठी कारवाईच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत.थकीत कर्ज वसुलीसाठी जिल्हा बॅँकेने आठ सहकारी संस्थांना सिक्युरिटायझेशन अ‍ॅक्टअंतर्गत जप्तीपूर्व नोटिसा बजाविल्या आहेत. या नोटिसांची मुदत संपली आहे. मात्र काही संस्थांनी बॅँकेशी संपर्क साधून, थकबाकी भरण्याचे आश्वासन दिले आहे. मेअखेर त्यांनी थकबाकी न भरल्यास या आठही संस्थांवर कठोर कारवाई करून त्यांची मालमत्ता जप्त करण्यात येणार आहे.अनेक अडचणींचे टप्पे पार करीत जिल्हा बँकेने प्रगती साधली आहे. साखर कारखान्यांच्या कर्जवाटपाने बॅँकेला मोठी मदत झाली आहे. कारखान्यांकडून शंभर कोटींपेक्षा जास्त व्याज जमा झाले आहे. मात्र शेतीकर्ज वाटपात बॅँकेला २0 ते २५ कोटींचा तोटा सहन करावा लागला आहे. दरवर्षी हा तोटा होतो. पण यावेळी यात वाढ झाली आहे. कारण कर्जमाफी मिळेल, या आशेने शेतकऱ्यांनी कर्जाची परतफेड केली नाही. त्यात दुष्काळी स्थिती असल्याने कर्जवसुली ठप्प आहे.

ऊस दरामध्ये झालेली घट यामुळेही शेतीकर्जाची वसुली अत्यंत कमी झाली आहे. जिल्ह्याचा २0१८-१९ या आर्थिक वर्षाचा क्रेडिट प्लॅन २ हजार १00 कोटींचा होता. यातील जिल्हा बॅँकेचे उद्दिष्ट १ हजार १0 कोटी होते. राष्ट्रीयीकृत व व्यापारी बॅँकेचे उद्दिष्ट १ हजार ९0 कोटी रुपयांचे होते. जिल्हा बँकेचे यातील प्रमाण ४८.१0 टक्के आहे. जिल्हा बँकेने १ लाख २५ हजार ८४६ शेतकऱ्यांना ८२६.३७ कोटींचा कर्ज पुरवठा केला आहे. एकूण कर्ज वितरणाशी त्याचे प्रमाण ४0 टक्के आहे.

 

टॅग्स :Banking Sectorबँकिंग क्षेत्रSangliसांगली