शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
3
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
4
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
5
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
6
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
7
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
8
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
9
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
10
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
11
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
12
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
13
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
14
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
15
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
16
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
17
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
18
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
19
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

ऐन दिवाळीत ग्राहकांना आर्थिक फटका, दसऱ्याला स्वस्त मिळालेले खाद्यतेल दिवाळीला महागले

By अविनाश कोळी | Updated: October 11, 2022 12:20 IST

खाद्यतेलाचे दर काही काळ स्थिर राहण्याचा तज्ज्ञांचा अंदाज खोटा ठरल्याने ग्राहकांना आर्थिक फटका

अविनाश कोळीसांगली : दसऱ्याला विक्रमी पातळीवर स्वस्त झालेले खाद्यतेल ऐन दिवाळीच्या तोंडावर पुन्हा महागले आहे. त्यामुळे सणाचे बजेट वाढणार आहे. खाद्यतेलाचे दर काही काळ स्थिर राहण्याचा तज्ज्ञांचा अंदाज खोटा ठरल्याने ग्राहकांना आर्थिक फटका बसणार आहे.मागील काही वर्षांत खाद्यतेलांच्या दरवाढीने नागरिकांना हैराण केले होते. महागाईच्या आगीत खाद्यतेलाच्या दराने तेल ओतण्याचे काम केले होते. यंदाचा दसरा तुलनेत खूप दिलासादायी ठरला. खाद्यतेल स्वस्त झाल्यामुळे सणाचा उत्साह द्विगुणित झाला होता.दसऱ्यालाही खाद्यतेलाची मागणी वाढली होती, तरीही दर स्थिर राहिले. दिवाळीत मात्र खाद्यतेलांनी अचानक भाव खाल्ल्याने नागरिकांच्या डोईवर चिंतेचे ढग दाटले आहेत.६ ते ८ टक्क्यांपर्यंत दरवाढदसऱ्याच्या तुलनेत सध्या सूर्यफूल, सरकी, शेंगतेल व सोयाबीन तेलाच्या दरांमध्ये ६ ते ८ टक्के दरवाढ झाल्याचे दिसून आले आहे. पंधरा दिवसांच्या कालावधीतच ही दरवाढ झाली आहे.

असे वाढले दर (प्रति किलो)तेल - २५ सप्टेंबर - १० ऑक्टोबरशेंगतेल - १९२ - १९४सूर्यफूल - १५० - १६५सोयाबीन - १४० - १४८सरकी - १४२ - १५०

का वाढले दर ?

सध्या दिवाळीमुळे खाद्यतेलांच्या देशांतर्गत मागणीत वाढ झाली आहे. याशिवाय जागतिक बाजारातही खाद्यतेलाच्या मागणीत अचानक वाढ नोंदली गेली आहे. त्यामुळे देशांतर्गत पुरवठ्यावर त्याचा परिणाम झाल्याने दरात वाढ झाली आहे. ही दरवाढ किती दिवस राहील, याचा अंदाज नाही.

अंदाज खोटा ठरला...खाद्यतेलाचे दर आता सणासुदीच्या काळात स्थिर राहतील, असा अंदाज राष्ट्रीय स्तरावरील तज्ज्ञांनी व्यक्त केला होता. मात्र, आताच्या दरवाढीने हे अंदाज खोटे ठरविले आहेत. भारताने सणांच्या पार्श्वभूमीवर ८ टक्के जादा खाद्यतेलांची आयात सप्टेंबर महिन्यात केली होती.

मालाची आवक घटल्याने, तसेच जागतिक स्तरावर मागणी वाढल्याने दरवाढ झाली आहे. दिवाळी सण बारा दिवसांवर आला असून, या काळात दर कसे राहतील, याचा अंदाज अद्याप बांधता येणार नाही. - राहुल कापशीकर, खाद्यतेल विक्रेते

दसऱ्यालाच खरेदी करायला हवी होतीदिवाळीला लागणाऱ्या खाद्यतेलाची खरेदी दसऱ्यालाच करायला हवी होती, असे आता वाटत आहे. तेलाच्या दरवाढीने चिंता वाढली आहे. - संगीता कांबळे, गृहिणी 

दसऱ्याला दर कमी झाल्याने दिवाळीत आणखी कमी होतील, असे वाटत होते. त्यामुळे त्यावेळी गरजेपुरती खरेदी केली होती. - पार्वती सुतार, गृहिणी

टॅग्स :SangliसांगलीDiwaliदिवाळी 2021Inflationमहागाई