Sangli: चांदोली परिसरात २.८ रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का, नागरिकांमध्ये घबराट
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2025 19:17 IST2025-06-09T19:15:37+5:302025-06-09T19:17:23+5:30
वारणावती : चांदोली परिसरात सायंकाळी ६ वाजून २९ मिनिटांनी २.८ रिश्टर स्केलचा सौम्य भूकंपाचा धक्का बसला. हा भूकंपाचा धक्का ...

Sangli: चांदोली परिसरात २.८ रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का, नागरिकांमध्ये घबराट
वारणावती : चांदोली परिसरात सायंकाळी ६ वाजून २९ मिनिटांनी २.८ रिश्टर स्केलचा सौम्य भूकंपाचा धक्का बसला. हा भूकंपाचा धक्का वारणावती परिसरात जाणवला असून यामुळे कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झालेली नाही.
भूकंपाचा केंद्रबिंदू वारणावतीपासून ८ किलोमीटर अंतरावर होता. भूकंपाच्या धक्क्यामुळे वारणा धरणाला कोणताही धोका नाही, असे धरण प्रशासनाने सांगितले आहे. हा धक्का सौम्य स्वरूपाचा असला तरी परिसरात तो जाणवल्यामुळे घबराटीचे वातावरण पसरलेले आहे.