चांदोली धरण परिसरात भूकंपाचा सौम्य धक्का
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2024 10:16 IST2024-09-04T10:16:16+5:302024-09-04T10:16:44+5:30
तीव्रता कमी असली तरी पहाटेच्या शांततेत हा धक्का जाणवला. त्यामुळे घबराटीचे वातावरण निर्माण झाले.

चांदोली धरण परिसरात भूकंपाचा सौम्य धक्का
लोकमत न्यूज नेटवर्क, शिराळा |
चांदोली धरण परिसरात बुधवार दि ४ रोजी पहाटे ४ वाजून ४ मिनिटांनी भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. वारणावती येथील भूकंपमापन केंद्रात भूकंपाची तीव्रता ३.० रिश्टल स्केल एवढी नोंदवली गेली. भूकंपामुळे कोणतीही वित्त वा जीवितहानी झाली नाही.
भूकंपाचा केंद्रबिंदू धरणाच्या पश्चिमेला ९.६ कि.मी वर होता अशी माहिती चांदोली पाटबंधारे शाखाधिकारी गोरख पाटील यांनी दिली. तीव्रता कमी असली तरी पहाटेच्या शांततेत हा धक्का जाणवला. त्यामुळे घबराटीचे वातावरण निर्माण झाले.