शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

सांगली जिल्ह्यात विधानसभेला आता ‘आयाराम-गयाराम’ पॅटर्न; पाडापाडीमध्ये काही नेत्यांना रस

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2024 16:54 IST

रात्रीस चाले पक्ष बदलाचा खेळ

सांगली : लोकसभेला सांगली पॅटर्न राज्यात नव्हे, तर देशात चर्चेत आला. आता विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील आयाराम-गयाराम चर्चेत आले आहेत. यंदाच्या विधानसभेला तिकीट मिळविण्यासाठी माजी खासदार संजय पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील हे राष्ट्रवादीत गेले. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष वैभव पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात गेले. भाजपचे मोहन वनखंडे हे काँग्रेसमध्ये गेले. अर्ज भरेपर्यंत आणखी काय बदल पाहायला मिळणार? याची उत्सुकता वाढली आहे.राज्यातील विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीविरुद्ध महायुतीच्या लढतीकडे देशाचे लक्ष लागले आहे. तसेच सांगली पॅटर्नमुळे चर्चेत आलेल्या सांगली जिल्ह्यातही काही लक्षवेधी लढती पाहायला मिळतील, असे चित्र आहे. जिल्ह्यात निवडून येण्याबरोबर पाडापाडीचे राजकारण केले जाणार, यात कोणतीही शंका नाही. स्वत: निवडून येण्यापेक्षा दुसऱ्याला पाडण्यात काहींना जास्त रस दिसतो, अशी काही मतदारसंघांतील स्थिती आहे. राज्य पातळीवरील कुरघोड्यांचे राजकारण नेतेमंडळींनी जिल्हा पातळीवर आणले आहे.

आचारसंहिता लागू झाल्यानंतर महाआघाडी आणि महायुतीमध्ये जागा कोणाला द्यायच्या, यावरून चर्चा झाली आहे. त्यानुसार, पहिल्या टप्प्यात चित्र स्पष्ट झाले आहे. दुसऱ्या टप्प्यातील जागा वाटपाकडे लक्ष लागले आहे. पहिल्या टप्प्यात तिकीट मिळविण्यासाठी काहींनी पक्षांतर केले.माजी खासदार संजय पाटील यांनी भाजपमधून राष्ट्रवादीत उडी मारली. त्यांचे प्रतिस्पर्धी राहिलेले दिवंगत नेते आर. आर. पाटील यांचे पूत्र रोहित पाटील यांच्याविरुद्ध ते शड्डू ठोकतील. माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडेही शिवसेनेतून तिकडे त्यांच्या मदतीसाठी गेले. भाजपचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांनी राष्ट्रवादी (अजित पवार गट) मध्ये प्रवेश करून राष्ट्रवादी (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याविरुद्ध शड्डू ठोकण्यासाठी राष्ट्रवादीत प्रवेश केला.

आणखी आयारामांची उत्सुकता ..काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीत जिल्हाध्यक्षपदाची संधी मिळालेले विट्याचे माजी नगराध्यक्ष वैभव पाटील राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षात गेले. भाजपचे प्रा. मोहन वनखंडे यांनी पालकमंत्री डॉ.सुरेश खाडे यांच्याविरोधात लढण्यासाठी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने जिल्ह्याच्या राजकारणातील आयाराम-गयाराम चर्चेत आले आहेत. या यादीत आणखी कोणाची भर पडणार ते लवकरच दिसून येईल.

उमेदवारीसाठी कायपण?मिरजेची जागा उद्धवसेनेला मिळू शकते म्हणून यापूर्वीच सिद्धार्थ जाधव यांनी शिवबंधन बांधून घेतले आहे. मिरजेत वंचितची उमेदवारी मिळते म्हणून राष्ट्रवादीचे युवानेते विज्ञान माने तिकडे गेले. तसेच शेवटच्या टप्प्यापर्यंत उमेदवारीसाठी आणखी काय पाहायला मिळणार? याकडे लक्ष लागले आहे.

जिल्हाध्यक्ष पक्ष बदलाने कार्यकर्ते संभ्रमात..मोठ्या राजकीय पक्षात जिल्हाध्यक्ष हे महत्त्वाचे पद असते. पक्षाची ध्येयधोरणे तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी, तसेच पक्षाचा चेहरा म्हणून या पदाला महत्त्व असते. परंतु रात्रीत जिल्हाध्यक्ष पक्ष बदलत असल्यामुळे कार्यकर्ते संभ्रमात पडल्याचे चित्र दिसते. नेत्यांबरोबर काही कार्यकर्त्यांचीही फरफट या निमित्ताने पाहायला मिळत आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४sangli-acसांगलीPoliticsराजकारण