शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

पावसाचा जोर ओसरला; अलमट्टीतून विसर्ग कमी केला, केवळ 'इतक्या' क्युसेकने विसर्ग सुरु

By अशोक डोंबाळे | Updated: July 29, 2023 19:22 IST

पश्चिम महाराष्ट्रातील धरणातील पाणीसाठी जाणून घ्या

सांगली : धरण क्षेत्रासह पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर कमी झाल्यामुळे अलमट्टी धरणातून सोडण्यात आलेला विसर्ग शनिवारी कमी करून केवळ ७५ हजार क्युसेकने सुरू आहे. धरणात सध्या एक लाख ४० हजार ९४८ क्युसेकने पाण्याची आवक होत असल्याचे पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात आले.अलमट्टी धरणाची पाणी क्षमता १२३ टीएमसी असून, आता धरणात ९०.३३ टीएमसी पाणीसाठा आहे. ७३ टक्के धरण भरले आहे. धरणात सध्या एक लाख ४० हजार ९४८ क्युसेकने पाण्याची आवक होत आहे. धरणात पाण्याची आवक जास्त असली तरी पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर कमी असल्यामुळे अलमट्टी धरण व्यवस्थापनाने विसर्ग कमी केला आहे. शुक्रवारी धरणातून एक लाख २५ हजार क्युसेकचा विसर्ग होता. ५० हजार क्युसेकने विसर्ग कमी करून शनिवारी दुपारपासून ७५ हजार क्युसेकने विसर्ग चालू आहे. पाऊस आणि धरणातील पाणीसाठ्यावर कर्नाटक आणि महाराष्ट्राचे जलसंपदा विभागाचे वरिष्ठ अधिकारी लक्ष ठेवून आहेत.

पश्चिम महाराष्ट्रातील धरणातील पाऊसधरण - आजचा साठा - धरणाची क्षमताकोयना - ६९.३३ - १०५.२५धोम - ९.८०  - १३.५०कन्हेर - ६.२९ - १०.१०वारणा - २९.२५ - ३४.४०दूधगंगा - १६.५४ - २५.४०राधानगरी - ८.२७ - ८.३६तुळशी - २.११ - ३.४७कासारी - २.२८ - २.७७पाटगाव - २.९५ - ३.७२धोम - ३.५३ - ४.०८उरमोडी - ५.५७ - ९.९७तारळी - ५.०३ - ५.८५अलमट्टी - ९०.३३ - १२३

जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरलासांगली जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत सरासरी ३.५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत पडलेला पाऊस व कंसात १ जूनपासून आतापर्यंत पडलेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी मिमीमध्ये पुढीलप्रमाणे. मिरज २.३ (१९४.३), जत ३.४ (१४८), खानापूर ०.९ (११५.८), वाळवा २.४ (२१०.४), तासगाव ४ (१९७), शिराळा ७.८ (५२९.५), आटपाडी ०.९ (११३.२), कवठेमहांकाळ ६.२ (१६५.६), पलूस १.९ (१७८.९), कडेगाव ५.७ (१४३.२).

टॅग्स :SangliसांगलीRainपाऊसDamधरणWaterपाणी