शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
3
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
4
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
5
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
6
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
7
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
8
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
9
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
10
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
11
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
12
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
13
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
14
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
15
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
16
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
17
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
18
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
19
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
20
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर

कर्नाटकातील अलमट्टी धरण ८१ टक्के भरले, ६५ हजार क्युसेकने विसर्ग सुरु

By अशोक डोंबाळे | Updated: July 18, 2024 18:01 IST

‘चांदोली’त ६२ टक्के, तर ‘कोयने’त ४२ टक्के पाणीसाठा

सांगली : कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांत पावसाचा जोर वाढल्यामुळे कृष्णा नदीतून अलमट्टी धरणात ७२ हजार २८६ क्युसेकने पाणी जमा होत आहे. धरणामध्ये ९९.३२ टीएमसी पाणीसाठा झाला असून ८१ टक्के धरण भरले आहे. धरणातून सध्या ६५ हजार क्युसेक विसर्ग सुरू झाला आहे. चांदोली (वारणा) धरणात ६२ टक्के, तर कोयना धरणात ४२ टक्के पाणीसाठा झाला आहे.कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यांत सलग आठ दिवस जोरदार पाऊस पडेल, असा भारतीय हवामानशास्त्र विभागाने अंदाज वर्तविला आहे. त्यानुसार सध्या चांदोली (वारणा), कोयना धरण क्षेत्रासह सांगली जिल्ह्यात जोरदार पावसाने सुरुवात केली आहे. शिराळा, वाळवा तालुक्यांत सोमवारी संततधार, तर उर्वरित तालुक्यांत पावसाची उघडझाप सुरू होती. दक्षिण महाराष्ट्रातील सांगली, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यांतील शेतकरी आणि पंचगंगा, कृष्णा, वारणा नदीकाठच्या नागरिकांचे अलमट्टी धरणाच्या पाणीसाठ्याकडे लक्ष लागून राहिले आहे. अलमट्टी धरणाची क्षमता १२३.०८ टीएमसी पाणीसाठ्याची आहे. गुरुवारी दुपारी या धरणामध्ये ९९.३२ टीएमसी पाणीसाठा होता. म्हणजेच दर जवळपास ८१ टक्के भरले आहे. धरणामध्ये सध्या ७२ हजार २८६ क्युसेकने पाण्याची आवक होत आहे. त्यामुळे कर्नाटकच्या पाटबंधारे विभागाने धरणातून ६५ हजार क्युसेकने विसर्ग सुरू केला आहे. चांदोली (वारणा) धरण क्षेत्रात पाऊस सुरू आहे. त्यामुळे सध्या कालवा व विद्युतगृहाद्वारे वारणा धरणातून एक हजार ६४९ क्युसेकने विसर्ग सुरू आहे.

धरणातील पाणीसाठाधरण - आजचा साठा - क्षमताकोयना - ४४.०७ - १०५.२५धोम - ०५.३९ - १३.५०कन्हेर - ०४.१२ - १०.१०वारणा - २१.५० - ३४.४०दूधगंगा - ११.९३ - २५.४०राधानगरी - ०५.०८ - ०८.३६तुळशी - ०२.०४ - ०३.४७कासारी - ०१.९४ - ०२.७७पाटगाव - ०२.८० - ०३.७२धोम-बलकवडी - ०१.०६ - ०४.०८उरमोडी - ०२.७४ - ०९.९७तारळी - ०२.५१ - ०५.८५अलमट्टी - ९९.३२ - १२३.०८

जिल्ह्यात ९.५ मिलिमीटर पाऊसजिल्ह्यात गेल्या २४ तासांत सरासरी ९.५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात गेल्या २४ तासांत पडलेला पाऊस व कंसात १ जूनपासून आतापर्यंत पडलेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी मिलिमीटरमध्ये पुढीलप्रमाणे. मिरज ४.७ (३००.८), जत ०.१ (२५०.८), खानापूर १.१ (२५६.६), वाळवा १७.७ (४११.६), तासगाव १.२ (३१४.८), शिराळा ५४.३ (५५५.३), आटपाडी ०.१ (२२३.६), कवठेमहांकाळ ०.८ (३२५.८), पलूस ३.९ (२९२.३), कडेगाव २.९ (३०३).

कृष्णा नदीची पाणीपातळीकृष्णा नदीची गुरुवारी सकाळी ८ वाजेपर्यंतची पाणीपातळी फुटांमध्ये पुढीलप्रमाणे आहे. कृष्णा पूल कऱ्हाड ७.२ फूट, बहे पूल ६, ताकारी पूल १३.०६, भिलवडी पूल १३.०२, आयर्विन १०, राजापूर बंधारा २०.१०, राजाराम बंधारा २२.५१ फूट आहे.

टॅग्स :SangliसांगलीKarnatakकर्नाटकDamधरणWaterपाणीriverनदी