शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
3
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
4
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
5
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
6
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
7
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
8
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
9
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
10
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
11
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
12
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
13
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
14
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
15
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
16
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
17
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
18
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
19
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला

अवकाळीमुळे निर्यातक्षम द्राक्षांवर संक्रांत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2019 15:32 IST

अवकाळी पाऊस आणि ढगाळ हवामानामुळे यंदा जिल्ह्यातून होणारी द्राक्षांची निर्यात घटली आहे. दरवर्षी सात ते आठ हजार टन निर्यात होते, मात्र यंदा ४0 टक्के बागा खराब झाल्या आहेत. दि. २ डिसेंबरपर्यंत केवळ १४५१ शेतकऱ्यांनी ८१०.४१ हेक्टरवरील द्राक्षबागांची निर्यातीसाठी नोंदणी केली असून, पहिला चौदा टनाचा कंटेनर मागील आठवड्यात सौदी अरेबियाला रवाना झाला आहे.

ठळक मुद्दे अवकाळीमुळे निर्यातक्षम द्राक्षांवर संक्रांत१४५१ शेतकऱ्यांचे ८१०.४१ हेक्टर क्षेत्र निर्यातीसाठी नोंदणी

अशोक डोंबाळे सांगली : अवकाळी पाऊस आणि ढगाळ हवामानामुळे यंदा जिल्ह्यातून होणारी द्राक्षांची निर्यात घटली आहे. दरवर्षी सात ते आठ हजार टन निर्यात होते, मात्र यंदा ४0 टक्के बागा खराब झाल्या आहेत. दि. २ डिसेंबरपर्यंत केवळ १४५१ शेतकऱ्यांनी ८१०.४१ हेक्टरवरील द्राक्षबागांची निर्यातीसाठी नोंदणी केली असून, पहिला चौदा टनाचा कंटेनर मागील आठवड्यात सौदी अरेबियाला रवाना झाला आहे.टेंभू, ताकारी, म्हैसाळ, आरफळ योजनांमुळे द्राक्षाचे क्षेत्र वाढू लागले आहे. जिल्ह्यात सव्वा लाख एकरापर्यंत द्राक्षाचे क्षेत्र झाले आहे. यापैकी १० टक्केच द्राक्षाची निर्यात होत आहे, असे द्राक्ष बागायतदार संघाचे सुभाष आर्वे यांनी सांगितले.रेसिड्यू फ्रीची कडक कसोटी पार करून ही निर्यात होत आहे. २०१६ मध्ये ६७३७ टन, २०१७ मध्ये ८८८७ टन, २०१८ मध्ये ८१४५, २०१९ मध्ये ७४२२.५० टन द्राक्षे नेदरलँड-नॉर्वे, अमेरिका, जर्मनी, डेन्मार्क, स्पेन, बेल्जियम, फ्रान्स, चीन आदी १९ राष्ट्रांमध्ये निर्यात झाली आहेत.

दुबई, चीन, रशिया, मलेशिया, सिंगापूरला द्राक्षांची मोठी निर्यात होते. डिसेंबर, जानेवारीमध्ये निर्यात होणाऱ्या द्राक्षांना सरासरी ८० ते १०० रुपये किलोपर्यंत दर मिळतो. त्यामुळे शेतकरी सप्टेंबरमध्ये द्राक्षांची छाटणी घेतात. यावर्षी सप्टेंबर ते नोव्हेंबर असे तीन महिने नदीकाठच्या भागासह दुष्काळी तालुक्यात मुसळधार पाऊस कोसळला.

सलग तीन महिने पाऊस आणि ढगाळ हवामान राहिले. द्राक्षबागेत सतत पाणी राहिल्यामुळे दावण्यासह अनेक रोगांचा फैलाव झाला. वेलींना मुळ्या सुटल्या, द्राक्षमण्यांची गळ झाली. खानापूर, तासगाव, जत, मिरज तालुक्यातील ४0 टक्के द्राक्षबागांचे शंभर टक्के नुकसान झाले आहे.

उर्वरित भागातील उत्पादन घटणार आहे. या सर्वाचा निर्यातीवर परिणाम झाला आहे. निर्यातक्षम द्राक्षांमुळे शंभर कोटींचे परकीय चलन जिल्ह्याला दरवर्षी मिळत आहे. यावर्षी १४५१ शेतकऱ्यांचे ८१०.४१ हेक्टर क्षेत्र निर्यातीसाठी नोंदणी झाले आहे, अशी माहिती कृषी अधिकाऱ्यांनी दिली. 

टॅग्स :fruitsफळेSangliसांगली