शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

दुष्काळात पाण्याच्या व्यवसायाचा सुकाळ : आटपाडी तालुक्यात उत्पन्नाचा नवा मार्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2019 1:25 AM

अविनाश बाड । आटपाडी : पिण्याच्या पाण्याच्या टंचाईने आटपाडी तालुक्यातील लोकांचे हाल सुरू केले आहेत. इथे पाण्याचा धंदा मात्र ...

ठळक मुद्देशासकीय यंत्रणेचा नाकर्तेपणा; दहा रुपयाला मिळते घागरभर पाणी

अविनाश बाड ।आटपाडी : पिण्याच्या पाण्याच्या टंचाईने आटपाडी तालुक्यातील लोकांचे हाल सुरू केले आहेत. इथे पाण्याचा धंदा मात्र भलताच तेजीत आला आहे. शासकीय पाण्याचे टँकर अंतर वाचवून पैसे मिळविण्यासाठी कुठूनही, कसलेही पाणी आणत आहेत. याचा फायदा शुद्ध पाणी विकणाऱ्यांनी घेतला आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याच्या टँकरवर शासन लाखो रुपये खर्च करत असताना नागरिकांना १० रुपयाला एक घागर या दराने पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे.

आटपाडी तालुक्यात यंदा पावसाच्या अभावामुळे भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. दि. १९ नोव्हेंबर २०१८ रोजी तालुक्यात आंबेवाडीला पहिला पिण्याच्या पाण्याचा टँकर सुरु झाला. सध्या तालुक्यात ७ गावात आणि १२७ वाड्या-वस्त्यांवर ११ टँकरच्या ३५ खेपांनी कागदोपत्री पाणी पुरवठा सुरु आहे. आधीच माणसी २० लिटरप्रमाणे पाणी मंजूर केले जाते. त्यात कधीच पूर्ण खेपा केल्या जात नाहीत. त्यामुळे जेव्हा टँकरचे पाणी मिळेल तेव्हा पाणी टंचाईने त्रासलेले नागरिक मिळेल तसले पाणी निमूटपणे घेतात. पण खारट, गढूळ साचलेल्या पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. हे पाणी पिल्याने लोकांना पोटाचे आजार होऊ लागले आहेत. यावर डॉक्टरांकडून पिण्यायोग्य पाणी पिण्याचा सल्ला दिला जात आहे. सध्या तालुक्यातील २३ हजार ९०८ एवढी लोकसंख्या टँकरवर अवलंबून आहे. नागरिकांना नाईलाजाने पिण्यासाठी पाणी विकत घ्यावे लागत आहे. तालुक्यात बहुतेक सर्व गावात घरोघरी लोक पिण्याचे पाणी विकत घेत आहेत. ५ रुपयाला २० लिटरपासून ते ४० रुपयांना २० लिटर या दराने पाणी विकणारे अनेक प्रकल्प तालुक्यात आहेत.

आटपाडीत फोन केला की घरपोच पाणी पुरवठा केला जातो. तर गावोगावी दररोज फिरुन शुद्ध पिण्याचे पाणी विकले जात आहे. आता शुद्ध असल्याचा दावा करुन विकले जाणारे हे पाणीसुद्धा खरेच आरोग्यास किती हितकारक आहे, हा चौकशीचा भाग आहे. लाखो रुपये खर्चून शासनाचे टँकर वेळेत येत नाहीत; मात्र खासगी विकतचे पाणी दररोज वेळेत उपलब्ध होत आहे.शासकीय पिण्याच्या पाण्याचे टँकर भरण्यासाठी निंबवडे येथील हिराबाई देवडकर यांची विहीर, आटपाडी ग्रामपंचायतीची तलावाखालील विहीर, जलशुद्धीकरण केंद्र, आटपाडी, राजेवाडी येथील सुरेश कोडलकर आणि झरे येथे भगवान पाटील यांची विहीर अधिग्रहण केलेली आहे. टँकरसाठी याच विहिरीतून पाणी भरणे बंधनकारक आहे. टँकरचालकांनी खेपा अंतर चूकवू नये, यासाठी सध्या जीपीएस प्रणालीचा वापर केला जात आहे. तरीही टँकरवाले खेपात आणि पाण्यात गोलमाल करुन लोकांचे हाल करीत आहेत. विहिरीतील आणि जलशुद्धीकरण केंद्रातील पाणी पिण्यायोग्य कसे येत नाही, यावर कुणीच गांभीर्याने पाहताना दिसून येत नाही.

अनेक टँकर शासकीय पाणी पुरवठा असे लिहिणे बंधनकारक असताना तसा फलक लावण्यात आलेला नाही. टँकरच्या क्षमतेबद्दल शंका व्यक्त केल्या जात आहेत. टँकरद्वारे पिण्यासाठी पुरविले जाणारे पाणी शुद्ध अथवा निर्जुंतक असल्याची तपासणी आरोग्य विभागाकडून केली जात नसल्याचे वास्तव आहे. टँकरद्वारे मंजूर असलेल्या पूर्ण खेपा दररोज विनाखंड टाकल्या जात नाहीत. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी लोकांना भटकंती करावी लागत असल्याचे चित्र आहे.टँकरचालक : मालामालवारंवार येणाºया दुष्काळाने तालुकावासीयांना पिण्याचे पाणी मिळविण्यासाठी हाल सहन करावे लागतात. टँकरच्या मंजुरीपासून बिले अदा करण्यापर्यंतच्या प्रवासात सरकारी बाबंूना टक्केवारी मिळते. सध्या १० हजार लिटर क्षमतेच्या टँकरला दिवसाला १११० रुपये अधिक १२ रुपये किमी दराने भाडे मिळते. अंतर आणि खेपा वाचवून टँकरवाले मालामाल होतात, तर ग्रामपंचायतीकडून खेपा झाल्याच्या नोंदीसाठी टँकरवाल्यांकडून सरपंचांसह पदाधिकारी ग्रामसेवक मलिदा खातात. आता खासगी शुद्ध पाणीवाले फिरुन थेट लोकांच्या खिशातून पैसे मिळवत आहेत.हे व्हायला हवेटँकरने पिण्यायोग्य शुद्ध पाणीच पुरवठा करायला हवा शिवाय या हागणदारीमुक्त तालुक्यात आता घरोघरी शौचालये झाली आहेत. पण शासन माणसी २० लिटरच पाणी मंजूर करते. त्यातले मिळते किती हा प्रश्नच आहे. या निकषात बदल करायला हवा. २०१३ च्या दुष्काळी परिस्थितीत माणसांबरोबर मोठ्या जनावराला ३० लिटरप्रमाणे पाणी टँकरने दिले होते. ते यावर्षीही द्यायला हवे. सध्या टँकरशिवाय १८ विहिरी आणि ३ बोअर दररोज ४०० रुपये देऊन पिण्यासाठी अधिग्रहण करण्यात आल्या आहेत. यांच्यासह टँकरवर अंमलबजावणीसाठी स्वतंत्र पथक नेमून फसवणूक करणाºयांवर फौजदारी दाखल करावी.विठलापूर (ता. आटपाडी) येथे १० रुपयाला घागर या दराने नागरिक पिण्याचे पाणी विकत घेत आहेत.

 

टॅग्स :Sangliसांगलीwater shortageपाणीटंचाई